आनंदी राहा! जिथे असाल जसे असाल तसे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा . किंबहुना आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करा . कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज आनंद देणार
नाही पण आनंद मिळवण्याची संधी मात्र नक्कीच देईल .
जर आनंदाचे काही कारणच नसेल तर आनंदी कसे राहणार? त्यासाठी आनंदालाच तुमचे कारण बनवा आणि त्याचा अनुभव घ्या !सकारात्मक विचार आणि खरा आनंद हेच मनाला बळकटी देतात . आनंदासाठी लाचार होऊन कारण शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक क्षण हीच आनंदी जीवनाची संधी आहे हे जाणणे , आवश्यक आहे. आनंद हि तुमची प्रतिक्रिया नसून तिला तुमची वृत्ती बनवा . प्रत्येक कृती मागे आनंद घेण्याचा हेतू ठेवा तरच ते तुमच्या जीवनातील एक सत्य असेल. हि गोष्ट खरच साधी, सोपी आणि कुणालाही जमण्या सारखी आहे. असं झाल्यास खरा आणि निखळ आनंद दूर नहि. अनुभवून पहा!
No comments:
Post a Comment