cake |
तुम्ही खरच याचा विचार कधी केला आहे का? आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या
गोष्टींतून तुम्हाला नक्की काय आणि कस हव आहे या बद्दल निर्णय घेतला आहे का?
प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला तुम्ही जे निर्णय घेत असता त्या वर तुमचे जीवन
बर्याच अंशी अवलंबून असते. आयुष्यातील बर्याच गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्याही
असू शकतात परंतु त्या चवकटीतही आपल्याला शक्य असतील असे योग्य निर्णय आपण घेऊ शकतो .
तुमचा जीवनाकडे अशाप्रकारे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच तुमच्या आयुष्यातच नव्हे तर या
जगात एक वेगळे पण निर्माण करू शकतो. तुम्ही क्षणोक्षणी जे निर्णय घेत आहात त्यातून
तुम्ही जीवनाच्या योग्य दिशेची वाटचाल करत आहात हे वेळोवेळी चाचपून पाहणे गरजेचे आहे.
किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयांना तुम्ही योग्य तो न्याय देत आहात किंवा नाही हे जाणणे
गरजेचे आहे. निर्णय घेऊन शांत बसून कोणतेही कार्य साध्य होत नहि. कृती न करता आपल्या
निर्णयाला नशिबाची साथ कधी मिळेल याची वाट पाहण्यात काही अर्थ नाहि .
तुम्हाला हव तस तुमच आयुष्य घडू शकत. गरज आहे ती योग्य निर्णय घेण्याची
आणि समर्थपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची!
घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे हि तितकेच महत्वाचे. निर्णयाचे परिणाम अनुभवण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी सुधा असायला हवी. खूप सुंदर लिहिल आहात.. मनापासून आवडले... :)
ReplyDeleteप्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !
ReplyDelete