Showing posts with label जाण. Show all posts
Showing posts with label जाण. Show all posts

Friday, May 17, 2013

कठीण तरीही सुंदर

Rose
जीवन कठीण आहे तरीही सुंदर आहे.  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका 
सकारात्मक असावा कि जीवनातील अडचणी तुम्हाला निराश करू शकणार नाहीत . 
आयुष्यात संकटाना पाठ फिरवणे किंवा टाळणे हा उपाय नसून योग्य तर्हेने 
त्यांना समोर जाऊन त्यातून बाहेर पडणे यात खरे समाधान आहे. 
जीवनात प्रश्न ज्या सातत्याने निर्माण होतील त्याही पलीकडे जाऊन त्या प्रश्नांचा 
पाठपुरावा करून सोडवणे गरजेचे आहे. तुमचे कौशल्य, कष्ट , स्वभावातील  
लवचिकता  पणाला लावून मार्ग काढा . 
अतिशय नगण्य वाटणाऱ्या छोट्या गोष्टीतला आनंदही वाया जाऊ देऊ नका . 
आयुष्याच्या प्रत्येक धाग्यातील परिपूर्णता अनुभवायचा प्रयत्न करा . 
प्रत्येक क्षण आयुष्यात छोटे छोटे बदल करण्यासाठी संधी देत असतो. योग्य 
दिशेने उचलेलं एक पाऊलहि भविष्यातील मोठ्या बदलांना सहायक ठरते . 
एकाद्या टप्प्यात आयुष्य फारच कठीण होऊन बसत यात शंका नाही पण काय 
हरकत आहे?  सगळी दु:ख एकत्र केली तर जीवनातील उत्तम गोष्टी आणि त्यातून 
मिळणारा आनंद त्याही पेक्षा जास्त असतो , गरज असते ती जाणीव पूर्वक 
जीवन जगण्याची!

Friday, May 10, 2013

तुम्हाला कस आयुष्य जगायचं आहे?

cake

तुम्ही खरच याचा विचार कधी केला आहे का? आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या 
गोष्टींतून तुम्हाला नक्की काय आणि कस हव आहे या बद्दल निर्णय घेतला आहे का?
प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला तुम्ही जे निर्णय घेत असता त्या वर तुमचे जीवन 
बर्याच अंशी अवलंबून असते. आयुष्यातील बर्याच गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्याही 
असू शकतात परंतु त्या चवकटीतही  आपल्याला शक्य असतील असे योग्य निर्णय आपण घेऊ शकतो . 
तुमचा जीवनाकडे अशाप्रकारे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच तुमच्या आयुष्यातच नव्हे तर या 
जगात एक वेगळे पण निर्माण करू शकतो. तुम्ही क्षणोक्षणी जे निर्णय घेत आहात त्यातून 
तुम्ही जीवनाच्या योग्य दिशेची वाटचाल करत आहात हे वेळोवेळी चाचपून पाहणे गरजेचे आहे. 
किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयांना तुम्ही योग्य तो न्याय देत आहात किंवा नाही हे जाणणे 
गरजेचे आहे.  निर्णय घेऊन शांत बसून कोणतेही कार्य साध्य होत नहि. कृती न करता आपल्या 
निर्णयाला नशिबाची साथ कधी मिळेल याची वाट पाहण्यात काही अर्थ नाहि . 
तुम्हाला हव तस तुमच आयुष्य घडू शकत. गरज आहे ती योग्य निर्णय घेण्याची 
आणि समर्थपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची!

Sunday, March 17, 2013

दुष्काळ : जबाबदार कोण?

Drought

सकाळी उठल्यावर डोळे उघडल्या उघडल्या आपण 
कराग्रे वसते लक्ष्मि,
कर मध्ये सरस्वती,
करमुले  तू गोविन्दम,
प्रभाते कर दर्शनम!
हि प्रार्थना करतो. आणि अशा 
पवित्र हातानी दिवसभरात योग्य  व पवित्र कर्म घडावे अशी अशा करतो.  
सध्या महाराष्ट्रासह बरीच राज्ये दुष्काळ ग्रस्त आहेत. कमी पाऊस आणि पाण्याचे अयोग्य नियोजन, रखडलेले प्रकल्प किंवा सीमा वाद यात राज्यकर्ते अडकलेले असताना सामान्य माणूस या दुष्काळाचे तडाखे सोसत आहे. गावाच्या गावं सोडून आपल्या कुटुंबांसह लोकांना स्थलांतर करावं लागत आहे. अनेक कुटुंबांचे जीवन अस्थिर झाले आहे आणि भविष्य अंधारात आहे. कदाचित त्यांना काही दिवस आर्थिक मदत मिळेलही परंतु पुन्हा नव्याने जीवनात स्थिरता निर्माण होण्याकरिता अनेक वर्ष निघून जातील. ज्यांचे जीवन शेती, पशुपालन याच गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून आहे त्यांची कहाणी तर अतिशय करूण  आहे. शहरात सर्व सुखसुवीधांसह राहणाऱ्या लोकांना याचे गांभीर्य कदाचित जाणवणार नाही. एक दिवसाचा पगार देऊन किंवा काही रक्कम दुष्काळ ग्रस्त निधी करता देऊन ते सर्व काही विसरूनही जातील. परंतु खर्या अर्थाने आपण यात  आपले योगदान देऊ शकतो आणि याचा विचार नक्की झाला पाहिजे.  या साठी आपण नक्की काय करू शकतो?
सकाळी उठल्या पासून आपण वीज आणि पाणी या दोन गोष्टीनचा वापर केल्या शिवाय कोणतेही काम करत नाही किंवा या व्यस्त आयुष्यात त्यांचा उपयोग अनिवार्य आहे.  या दोन्हीही गोष्टी वापरताना किती शिस्त बाळगली जाते या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. "वीज आणि पाणी आपला जन्मसिद्ध अधिकार आहे  आणि त्याची हवी तशी उधळपट्टी मी करणारच" हे विचार चुकीचे आहेत, हे आधी आपल्या मनाला समजावणे गरजेचे आहे.  काही वेळा आपण या बाबतीत जागरुकता दाखवत नाहीच परंतु जे जागरूक आहेत त्यांची थट्टाही करतो. असे करण्याने थोड्या वेळा पुरते नक्कीच तुमचे मनोरंजन होईल परंतु भविष्यात वीज आणि पाण्याच्या कमतरतेची समस्या  अशा निष्काळजी पणामुळे सर्वांनाच भोगावी लागणार आहे. पुढच्या  पिढी साठी 
तुम्ही किती रक्कम किंवा जमीन जुमला नावावर ठेवता या गोष्टींपेक्षा वीज आणि पाण्याच्या समस्येतून  पुढची पिढी वाचावी या साठी तुम्ही काय नियोजन कराल याचा नक्की विचार करा. कारण या मूळ गरजा भागल्या नाहीत तर तुमच्या संपत्ती आणि जमिनीला काडीमात्र किंमत उरणार नाही.  गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक शेत जमिनी - घर, हॉटेल्स बांधण्याकरिता वापरल्या जात आहेत. अनेक जंगलांची तोड होत आहे. या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करून आपण आपलेच भविष्य धोक्यात आणत आहोत.  विचार करून कृती करा, वेळ गेलेली नाही, आज स्वतः पासून सुरवात करा आणि भविष्यात इतरांसाठी प्रेरणा बना!


Monday, February 25, 2013

आयुष्य

आयुष्यातील चढ उतार कुणालाही चुकले नाहीत.  संकटं आली कि हातात हात घालून येतात. आर्थिक, मानसिक ,शारीरिक एकदम एकत्र  जमतात . एकातून बाहेर पडाव तर दुसरं हजर असत . परंतु परिस्थिती बदलली कि हेच सगळ सोपं  वाटत . सगळ्या संकटांना सहज पळवता येत आणि" अरे हे आपण आधी का नाही केल ?"असं स्वतः लाच विचारावस वाटत. संकटं गेली तरी मनावरचे घाव भरत नाहीत. असं असलं तरी आयुष्य काही थांबत नाही. म्हणून सतत आनंदी राहावं, आयुष्याला हसत मुखाने सामोर जाव . संकटकाळी इतरांना मदत 
करावी , कधीतरी याच नावेत आपणही प्रवास करत होतो याची जाण सतत असू द्यावी.