* बरेच दिवस रेंगाळलेल एखाद काम पूर्ण करा .
* कुणाची तरी एखादी गरज पूर्ण करून त्याला आश्चर्य चकित करा .
* काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा .
* ज्याला गरज असेल त्याला तुमच्या साथीचा / सहवासाचा लाभ द्या .
* जे तुम्हाला येत असेल ते इतरांना शिकावा .
* विरोधकांची मते समजून घ्या
* कुणाचीतरी मनःपूर्वक प्रशंसा करा
* ताजेतवाने होण्या साठी थोडे चाला किंवा व्यायाम करा
* तुमच्या घराची स्वच्छता / आवरा आवर करा
* एखाद्या गोष्टी बद्दलची मनातील भीती बाजूला सारून धैर्याने तिला सामोरे जा
* कुणाचे तरी मनापासून आभार माना
* इतरांचे विचार ऐकून घेण्याचा मनापासून प्रयत्न करा
* मजे साठी एखादी गोष्ट करा
* स्वतः करिता व आपल्या आस पास असलेल्या माणसांकरिता सहनशील राहण्याचा प्रयत्न करा
जीवनात अशा प्रकारे प्रत्येक दिवस नवीन कल्पना , आशा आकांक्षानि परिपूर्ण जगा . गेलेला
क्षण परत येणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचे मोल जाणा आणि आयुष्य सुंदर करा!
No comments:
Post a Comment