क्षमा

Pages

  • My Thoughts
  • My Favorite Videos
  • My Recipes
Showing posts with label व्यायाम. Show all posts
Showing posts with label व्यायाम. Show all posts

Friday, March 14, 2014

चरबी किंवा मेद (स्वरूप व उपाय )

पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया.
वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात.
आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यासाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवासारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी साखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपानामुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यांबद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पेक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशाप्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातूच्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
निबंधा देशमुख यांनी शेयर केलेल्या माहिती वरून 


  • Kshama Bade
Posted by Kshama at 7:03 PM 1 comment:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: आयुर्वेद, आहार, चरबी, मेद, वजन, व्यायाम

Tuesday, May 14, 2013

आज काय कराल?



*  बरेच दिवस रेंगाळलेल एखाद काम पूर्ण करा .  
*  कुणाची तरी एखादी गरज पूर्ण करून त्याला आश्चर्य चकित करा . 
*  काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा . 
*  ज्याला गरज असेल त्याला  तुमच्या साथीचा / सहवासाचा लाभ द्या . 
*  जे तुम्हाला येत असेल ते इतरांना शिकावा . 
*  विरोधकांची मते समजून घ्या 
*  कुणाचीतरी मनःपूर्वक प्रशंसा करा 
*  ताजेतवाने होण्या साठी थोडे चाला किंवा व्यायाम करा 
*  तुमच्या घराची स्वच्छता / आवरा आवर करा 
*  एखाद्या गोष्टी बद्दलची मनातील भीती बाजूला सारून धैर्याने तिला सामोरे जा 
*  कुणाचे तरी मनापासून आभार माना 
*  इतरांचे विचार ऐकून घेण्याचा मनापासून प्रयत्न करा 
*  मजे साठी एखादी गोष्ट करा 
*  स्वतः करिता व आपल्या आस पास असलेल्या माणसांकरिता सहनशील राहण्याचा प्रयत्न करा 

जीवनात अशा प्रकारे प्रत्येक दिवस नवीन कल्पना , आशा आकांक्षानि परिपूर्ण जगा . गेलेला 
क्षण परत येणार  नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचे मोल जाणा आणि आयुष्य सुंदर करा!
Posted by Kshama at 6:39 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: अपेक्षा, आनंद, गरज, जीवन, व्यायाम

Friday, March 15, 2013

आला उन्हाळा , तब्बेत सांभाळा !

उन्हाळा सुरु झाला आहे. सकाळी उठण्या पासून रात्री झोपे पर्यंतच्या दिनचर्येत झालेल्या बदलांतून हे सहज लक्षात येत आहे. शहाळ्याच पाणी, लिंबाचे/आवळ्याचे  सरबत, ताक , 
कोकम सरबत,वेज सूप , थंडाई ,रोझ सिरप , आणि आता आंब्याचं पन्ह  पिण्याकडे कल  वाढतो आहे तर संत्री , मोसंबी सहज खावीशी वाटू लागली आहेत. शक्यतो शीत पेयांपासून 
दूर राहण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे तब्बेतीची काळजी सहज घेतली जाते. सर्व कामे करताना आपली गती थोडी मंदावली आहे असं वाटत आहे. व्यायाम नियमित होत नसला तरी चालू ठेवणे आवश्यक आहे. मुंबईतील उन्हाळा घामाने बेजार करतो. त्यामुळे सतत पाणी पीत राहणे गरजेचे वाटते. प्रवास करायचाच झाला तरी शक्य झाल्यास उन्हाच्या वेळा टाळून करणे उचित! घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडायचे झाल्यास सन कोट,हात मोजे, गॉगल ,स्कार्फ अशी तयारी अनिवार्य झाली आहे. उन्हाने जळणारी त्वचा काळी पडू नये यासाठी सनस्क्रीन लावणे ओघाने आलेच. आहार हलका घेणे, तळलेले पदार्थ टाळणे , पाले भाज्या आणि सलाड चे प्रमाण रोजच्या आहारात वाढवणे ,हि पथ्ये तब्बेत उत्तम ठेवातील  अशी आशा करूया. प्रयत्न पूर्वक उन टाळणे, न चुकता टोपी / छत्री यांचा वापर करणे श्रेयस्कर. तुम्ही स्वास्थ्य टिकवण्यासाठी यातील काय काय करता आणि या व्यतिरिक्त कोणती काळजी घेता ?
Posted by Kshama at 9:14 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: आहार, उन, उन्हाळा, प्रवास, व्यायाम, स्वास्थ्य

Monday, March 11, 2013

मोर्निंग वॉक

Morning Walk 
गेले काही महिने दर थोड्या दिवसांनी मी एक संकल्प करत असते. काहीच दिवसात तो मोडतो आणि मग नव्या उमेदीने स्वतःला आठवण करून द्यायची वेळ येते. तो संकल्प म्हणजे रोज सुप्रभाती फिरायला जाणे. एक सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून नियमित चालायला जावे हि इच्छा मनात बाळगून 
रोज सकाळी लवकर उठण्याचा सराव ठेवला आहे   परंतु काही वेळा कामाच्या,झोपेच्या किंवा ऋतूच्या बदलत्या स्वरूपा मुळे ते घडत नाही असे लक्षात 
आले. मग एक कल्पना सुचली. ज्यावेळी फिरायला जाऊ त्यावेळी दिनदर्शिकेवर त्या तारखेला फुली मारणे सुरु केले. महिन्याच्या शेवटी फुल्यांची संख्या बघून स्वतः चीच लाज वाटली. एक स्त्री म्हणून घरातील इतर कामे, कार्यालयातील जबाबदाऱ्या सहज स्वीकारताना, मी  व्यायामा बद्दल इतकी निष्काळजी कशी राहू शकते याचे माझे मलाच आश्चर्य वाटले.  कारण काहीही असो, असेच जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर तुमचा अभिप्राय नक्की द्या. या संदर्भात तुम्ही कोणते उपाय अवलंबले ते हि नक्की कळवा.

Posted by Kshama at 6:33 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: उपाय, मन, व्यायाम, संकल्प
Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Visit Again

Check Offers

Blog Archive

  • ▼  2024 (1)
    • ▼  November (1)
      • मेरे ढोलना सुन Diwali special event Watch full video
  • ►  2023 (5)
    • ►  February (4)
    • ►  January (1)
  • ►  2022 (9)
    • ►  December (2)
    • ►  October (1)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  May (2)
    • ►  April (1)
  • ►  2021 (7)
    • ►  December (2)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (1)
  • ►  2020 (2)
    • ►  May (2)
  • ►  2019 (18)
    • ►  November (2)
    • ►  August (1)
    • ►  June (2)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (7)
    • ►  January (2)
  • ►  2018 (126)
    • ►  December (3)
    • ►  November (32)
    • ►  October (26)
    • ►  September (11)
    • ►  August (1)
    • ►  July (17)
    • ►  June (7)
    • ►  May (17)
    • ►  April (6)
    • ►  March (1)
    • ►  February (3)
    • ►  January (2)
  • ►  2017 (15)
    • ►  November (2)
    • ►  October (4)
    • ►  May (1)
    • ►  March (6)
    • ►  February (2)
  • ►  2016 (9)
    • ►  May (2)
    • ►  April (1)
    • ►  March (5)
    • ►  January (1)
  • ►  2015 (16)
    • ►  October (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (3)
    • ►  May (4)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
  • ►  2014 (14)
    • ►  December (2)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  March (5)
    • ►  February (1)
    • ►  January (1)
  • ►  2013 (115)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (3)
    • ►  September (5)
    • ►  August (2)
    • ►  July (3)
    • ►  June (5)
    • ►  May (20)
    • ►  March (21)
    • ►  February (54)

विचार गंगा .. माझा विचार प्रवाह

My photo
Kshama
गेले काही दिवस रोज मनात येणाऱ्या विचारांना शब्दात उतरवायचा एक छोटा प्रयत्न करत होते आणि अस लक्षात आल कि आपण आपले विचार सहज सोप्या शब्दात मांडू शकतो आणि त्यातून बरच काही शिकू शकतो. माझे विचार हे माझ्या आयुष्यातील चांगल्या / वाईट अनुभवातून उमटलेल्या भावना आहेत. वाचक त्यांच्याशी सहमत असतील किंवा नसतीलही परंतु वाचकांच्या प्रतिक्रिया फार मौल्यवान आहेत. माझ्या या छोट्या भावविश्वात आपले स्वागत आहे.
View my complete profile

Rangoli

Rangoli

Contact Form

Name

Email *

Message *


Popular Posts

  • शनि महात्म्य
    मला आवडलेले मराठीतील 80 ओव्यांचे शनि महात्म्य इथे देत आहे.  वाचायला सोपे आणि लवकर पाठ होईल असे स्तोस्त्र आहे. ज्यांना मोठे शनि महात्म्...
  • लाकडी रांगोळी बॉर्डर लाकडी रांगोळी चौकोन दगडूशेठ हलवाई गणपती रांगोळी सं...
  • वंदे भारत आतून नक्की कशी आहे? How is Vande Bharat from inside #Mumbai ...
  • मेरे ढोलना सुन Diwali special event Watch full video
  • मोराची चिंचोली : भाग पहिला
    नाचरे मोरा   आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर कि...
  • आनंदाचा ठेवा !
    सहज विचार करत असताना एक गोष्ट मनात आली.  जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक आहेत आणि कुठेही खरेदी करता येत नसल्या तरी त्या आपल्याल...
  • (no title)
    नाद हा शब्द किती विविध अर्थी वापरला जातो.  डमरू चा नाद ईश्वराची आठवण करून देतो तर  विषय विकारांचा नाद किंवा व्यसनांचा नाद  माणसाचे जीवन उ...
  • मोराची चिंचोली : दुसरा भाग
    मोराची चिंचोली : पहिला भाग  मोराच्या चिंचोलीला कस पोचाल  ?                                                                 पुणे ते चिंचो...
  • (no title)
    जीवनाच्या संघर्षात जीव ओतूनही मृदू राहावा लागत. तर कधी कठोर होऊन निर्णयाप्रद जाव लागतं . प्रसंगानुरूप / गरजेनुरूप सतत बदलावं लागतं . एक...
  • (no title)
    धीराचे दोन शब्द मनाला सुखावून जातात. अजूनही कुणीतरी आपल्या दुख्हात दुखी आणि  आनंदात आनंदी आहेत याची जाणीव करून देतात. प्रत्येक वेळीच फार ...
Kshama. Picture Window theme. Powered by Blogger.