Mehngai |
पैसे मिळवण्याची सगळ्यांना लागली आहे घाई
कारण त्याच एकच वाढती महागाई !!!!!
वाढत्या महागाईला तोंड देणार तरी कसं ?
घरातील वाढत्या जबाबदार्या आणि बदलती
जीवनशैली हे सगळ पेलवेल का असं ?
जीवन का जगत आहोत? जीवन कस जगत आहोत?
जीवन खर कसं जगायचं आहे ? आता विचार करायला वेळ नाही
कारण पाठीशी लागली आहे महागाईची कोल्हेकुई !
दिवस भर धावतो आहे, काबाड कष्ट करतो आहे
तरीही दिवस अखेरीला मध्यमवर्गीय रडतो आहे.
मध्यमवर्गीय असणं हा आता झाला आहे गुन्हा
आणि उच्च वर्गात झाला आहे लाजेचा भाग उणा
लाज सोडून जगणं मध्यमवर्गीयाचा धर्म नाही
भले दुःखाच जिण आल पदरी तरी त्याची फिकीर नाहि.
वाईटातून चांगले बदल कधीतरी नक्की होतील ,
प्रामाणिकपणाने जगणारे विजयी ठरतील
आता क्रांतीचे वारे वाहू लागतील आणि पुन्हा एकदा
सगळे, सत्याचा असत्यावर विजय पाहतील !
No comments:
Post a Comment