आयुष्यातले काही दिवस असेही असतात जेव्हा तुमच्या संपर्कातील
प्रत्येक व्यक्ती तुम्हाला गृहीत धरत असते. काही वेळा आपणच या
सर्वाला कारणीभूत असतो तर काही वेळा आजूबाजूची परिस्थिती
अस घडवून आणत असते. अशावेळी दूरच्या व्यक्तींपासून जवळच्या
व्यक्तीनपर्यंत कुणीच तुमच्या भावना खर्या अर्थाने जाणून घेण्याचा
प्रयत्न करीत नाही याची जाणीव प्रकर्षाने होत राहते. याचा परिणाम
झाल्याने आपले विचार नकारात्मक होतात, मन उदास होते, काहींच्या
बाबतीती तर आत्महत्येचे विचारही मनात घर करू लागतात. हे
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कमी अधिक फरकाने घडते. आणि
अशा नकारात्मक विचारांना तुम्ही अवाजवी महत्व दिलत तर
तुम्ही अधिकाधिक खचून जाता. या सर्वांपासून दूर राहण्याचा
उपाय म्हणजे
* निष्ठेने आपले जीवन जगत राहणे,
* उपलब्ध असलेल्या साधनातून उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्न करणे
आणि त्यातून आनंद मिळवणे.
* अनाठायी अपेक्षा आणि तुलना यांपासून लांब राहणे.
* बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या प्रमाणे स्वतःत
सकारात्मक बदल घडवून आणणे.
* आरोग्य उत्तम राखणे
No comments:
Post a Comment