Tuesday, August 13, 2013
Monday, August 12, 2013
Saturday, July 27, 2013
नात तुझ नि माझं
![]() |
| Friendship |
दूर असूनही मनानी जवळ राहायचं
कळत नकळत एकमेकांसाठी झुरायचं
तरीही प्रत्येक यशात आणि अपयशात
एकमेकाला सावरायचं ,
मनातल्या जपलेल्या क्षणांना ओठावर
येऊ नाही द्यायचं
फक्त त्यांना मनोमन आठवून
आनंदाने बहरून जायचं
कोणतीही अपेक्षा, कोणतीही आशा न
ठेवता , एकमेकांसाठी देवा कडे मागणं
मागायचं
कुठेही असलो तरी मैत्री साठी
सर्वस्व पणाला लावायचं !!
--क्षमा
दुनियादारी
![]() |
| Duniyadari |
आत्ताच प्रदर्शित झालेल्या या "महाविद्यालयीन काळातील दुनियादारी" दाखवलेल्या
चित्रपटा मुळे हा शब्द फारच प्रसिद्ध झाला . परंतु माझ्या मते या शब्दाचं मूळ हे
प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. मग तो मराठी माणूस गिरगावातील
चाळीत राहणारा किंवा डोंबिवली किंवा पुण्यात राहणारा असो / गणपतीत गणेशोत्सव साजरा
करण्या करिता एकत्र येणारा असो/होळी साठी एक महिना आधी पासून साहित्य गोळा
(चोरणारा ) असो. शेजारच्या घरात आजारी पडणार्याची चौकशी करण्या पासून
शेजार्यांची काळजी घेणारा असो. किंवा
सोसायटीत कुणाच कनेक्शन कुणाशी यावर लक्ष ठेवणारा असो . आपल्या मुलां प्रमाणे
शेजार्यांच्या मुलांवरही शिस्त लागावी म्हणून रागावणारा असो किंवा सणासुदीला एक
मेकांना गोड धोड घरी नेवून देणारा असो . शेजारी लग्न कार्य असेल तर आपल्या घरातच
सण समारंभ असावा त्याप्रमाणे शेजार्यांच्या पाहुण्यांची सरबराई करणारा असो .
मराठी माणसाच्या रक्तातील हा गुण आहे असं म्हणायला हरकत नाही . या मुळेच
एकेकाळी मराठी समाज एक आदर्श समाज म्हणून ओळखला जात होता आणि
आपल्यातील ऐक्य टिकून आहे . आज अशी दुनियादरी टिकवणण्या साठी आपण आपल्या
परीने काय प्रयत्न करत आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. अशी
दुनियादारी टीकवण्याकरिता आणि आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना या साठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही काय कराल?
Wednesday, July 24, 2013
विरक्ती
"मी सगळ्यातून विरक्ती घेतली आहे" असं बर्याच माणसांकडून ऐकायला मिळतं . पण खरच
असं म्हणणारी माणसं विरक्त असतात का? आसक्ती चा नाश म्हणजे विरक्ती पण
अशी विरक्ती जर सक्ती ने घेतलेली असेल तर त्याला खर्या अर्थाने विरक्ती म्हणता येणार नाही .
सक्तीची विरक्ती म्हणजे
"ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होणार नाहीत किंवा
या पुढे आपण त्या साध्य करू शकणार नाही किंवा
ज्या गोष्टींवरचा आपला ताबा नाहीसा होतो आहे आणि तो परत
मिळणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या गोष्टी टाळणे पण
मनातून असे झाल्याचे दुखः करत राहणे"
अशा सक्तीच्या विरक्तीने मनःशांती मिळणार तर नाहीच परंतु मनाची व्याकुळता जास्तच
वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा सक्तीच्या विरक्ती पासून शक्यतो स्वतःला दूर ठेवण्याचा
प्रयत्न करावा . त्या ऐवजी योग्य विचाराने आणि आचरणाने विरक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा .
हे सहज शक्य नसले तरी सराव केल्याने सहज साध्य होण्या सारखे आहे.
या साठी समाधानी वृत्ती ठेवणे जास्त महत्वाचे आहे . खोटा अहंकार, स्पर्धा , तुलना या गोष्टी
दूर ठेवणे गरजेचे आहे . आपण प्राप्त परिस्थितीत ज्या भूमिकेत आहोत ती योग्य तर्हेने पार
पडण्यासाठी जो त्याग , कष्ट करावे लागतील ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि
कर्तव्ये निष्ठेने आणि कसोशीने पार पाडावीत . असे केल्याने मनःशांती तर मिळेलच परंतु
मन विरक्तीच्या दिशेनेहि सहजतेने वळवता येइल.
Saturday, June 22, 2013
मीच माझा शत्रू !
![]() |
| Kedarnath |
सध्या दूरदर्शन वर आपण केदारनाथ आणि आसपासच्या परिसरातील दुर्घटनेच्या बातम्या
सतत पाहत आहोत. अनेक उध्वस्त झालेली कुटुंब आणि त्यांचे आक्रोश मन अस्वस्थ
करत आहेत. काही क्षणात होत्याच नव्हत झालं आणि एकच क्रंदन सुरु झालं . हि भीषण
अवस्था पाहिल्यावर एक गोष्ट पटली कि आपणच आपले शत्रू बनलो आहोत. आपला
वाढता हव्यास, जीवनीतील भौतिक सुखांकडे आपला वाढत असलेला अवास्तव
कल , पुढच्या पिढ्यांचा विचार न करण्याची आपली वाढती मानसिकता , वाढता चंगळवाद
आणि त्यामुळे वाढणारी आपापसातील स्पर्धा !
प्रत्येक दिवसागणिक जितक जास्त भौतिक सुख मला मिळालं तितक खर्या अर्थाने मी
जीवन जगलो अशी जर आपली मानसिकता असेल तर ती लवकरच आपल्याला आपल्या
नाशाकडे घेऊन जाईल यात शंका नाही . वेळ आली आहे ती योग्य विचार करण्याची …
भविष्याचा विचार न करता माणसाने निसर्गावर असेच अतिक्रमण चालू ठेवले तर
हा सहनशील निसर्गही असे रुद्र रूप वारंवार दाखवल्याशिवाय राहणार नाही .
निसर्ग हि ईश्वरी देणगी आहे आणि तीच संगोपन आणि योग्य तर्हेने उपयोग करणे
आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. अधिकाराच्या , सत्तेच्या
आणि श्रीमंती च्या मागे लागलेले आपण सर्वजण आज सोयीस्कर रित्या आपली
कर्तव्य विसरत आहोत . आणि याचे परिणाम आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे
लागतील यात शंका नाही .
Friday, June 14, 2013
My corner: Ownership
My corner: Ownership: Ownership I am sure most of you think about an ownership flat, what with the skyrocketing prices of residential spaces today. But I am...
Friday, June 7, 2013
Thursday, June 6, 2013
भूतकाळातील नैराश्य
जे काही भूतकाळात घडून गेल आहे, तसच आताही घडत राहील असं नाहि. कारण या क्षणी
जे घडत आहे त्याची दिशा बदलण्याची संधी तुम्हाला आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रद
प्रवास सुरु केला असेल आणि योग्य दिशेने पावले उचलली असतील तर तुम्ही प्रगतीचा वेग वाढवू शकाल . तुम्ही भूतकाळात काही अडचणी किंवा नैराश्य अनुभवलं असेल तर नव्या दिशेनी जाण्याची हीच वेळ आहे.
जे काही घडून गेलं त्यावर विचार करत बसलात तर तुम्ही त्यातच गुंतून राहाल . त्यापेक्षा
योग्य दिशेने पावले उचला . "झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा " हे वाक्य सार्थक करण्याचा
प्रयत्न करा .
आजचा दिवस नवा आहे . तो नव्याने उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न करा . थोडक्यात
म्हणजे हा तुमचा दिवस आहे . जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्या करता मदत करणार
आहे .
भूतकाळातील वाईट गोष्टींतून बाहेर पडण्याकरिता बरेच कष्ट आणि सातत्य लागेल परंतु
त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता . भूतकाळातील दुक्खांच्या गर्तेत अडकण्या पेक्षा
भविष्य काळ उज्वल करण्या करिता पाऊले उचलणे केव्हाही श्रेयस्कर!
जस जसे तुमचे यश नजरेच्या टप्प्यात येऊ लागेल , भूतकाळातील दुख्खांचे चटके कमी
होऊ लगतिल. दूरदर्शी व्हा आणि लक्षात ठेवा तुम्ही नक्कीच भविष्यातील प्रत्येक दिवस
एक नवा उत्तम दिवस म्हणून जगू शकता .
Monday, June 3, 2013
स्वतः साठी पाच मिनिटे
केवळ पाच मिनिटात तुम्ही शांत झोपेतून जागे होऊन सकाळच्या गार हवेत
फिरायला जाण्यासाठी तयार होऊ शकता .
केवळ पाच मिनिटात टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद तुम्ही नीटनेटके
करून काम करण्यासाठी टेबल स्वच्छ करू शकता .
केवळ पाच मिनिटात राग आणि नैराश्यातून बाहेर पडून तुम्ही नवा निर्धार करू शकता .
नव्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता .
केवळ पाच मिनिटात तुम्ही नकारात्मक विचार सकारात्मक करू शकता .
पाच मिनिटं हा जास्त कालावधी नाही . ती पटकन निघून जातात .
परंतु पाच मिनिटाच्या या काळात तुम्ही बरच काही पार करून जाता .
नव्याने विचार करू लागता . विचारांची दिशा बदलायला कष्ट नक्कीच लागतात पण फार वेळ लागत नाही . केवळ पाच मिनिटात तुम्ही निष्फळ विचारांतून बाहेर पडून , असा बदल घडवू शकता जो आयुष्यात पुढे जाऊन तुमचे हित करेल . जे करणं गरजेच आहे अशा प्रत्येक गोष्टी करता पाच मिनिट द्या, योग्य विचार करा . त्या पाच मिनिटात केलेला एक सकारत्मक विचार तुमच आयुष्य बदलू शकतो. स्वतः साठी दिलेली अशी पाच मिनिटं आयुष्यात एक चिरकाल टिकणारा आनंद देऊ कतात .
बघा जमत का !
Subscribe to:
Posts (Atom)







