Sunday, March 13, 2016
सहज आणि सोपी रांगोळी
आनंद घ्या सहज आणि सोप्या रांगोळ्यांचा ! भेट द्या www.RangoliKolam.in
तुमची रांगोळी पाठवा http://rangolikolam.in/submit-your-rangoli/
आणि तुमची हि रांगोळी पहा आमच्या वेबसाईट वर
Wednesday, January 20, 2016
Tuesday, October 6, 2015
डायबेटीस : डॉक्टरांनी दिलेला सल्ला
डायबेटीस : डॉक्टरांनी दिलेला सल्ला
नित्यनेमाने एक तास फिरणे किंवा योग आणि प्राणायाम किंवा असा व्यायाम ज्याने शरीरातून घाम येईल
योग्य आहार , समतोल आहार आणि ठरलेल्या वेळेत आहार या तीन गोष्टींच काटेकोर पालन .
आहार आणि आहाराच्या साधारण वेळा ज्या जपल्याने फायदा झाला .
१) सकाळी उठल्यावर चहा आधी
कोरफड + आवळा ज्यूस / दुधी + आवळा ज्यूस /जांभूळ ज्यूस /कारलं + आवळा ज्यूस ( पतंजली )
२) ब्रेकफास्ट : उपमा / पोहे / इडली / ऑम्लेट /ओंट्स /दलिया , प्रोटीन पावडर ( साखर नसेल अशी )
३) सकाळी ११ वाजता एक फळ ( सफरचंद / डाळिंब / पपई /पेर /पिच /कलिंगड /संत्र /मोसंब ) व सलाड (काकडी ,टोमाटो , कांदा, मुळा ) { बीट आणि गाजर वर्ज्य }
सलाड फळा बरोबर किंवा जेवणाच्या एक तास आधी खावे
४) दुपारी १ ते २ या वेळात पूर्ण जेवण (भाकरी / पोळी आणि दही , भाजी , भात , वरण किंवा आमटी )
५) दुपारी ३ वाजता एक फळ
६) संध्याकाळी ६ वाजता एक फळ किंवा मेरी बिस्किट्स ( पतंजली मेरी घ्यावी . ती गव्हाची आहेत मैद्याची नाहीत ) किंवा चणे
७) रात्री ८.३० ते ९. ३० या वेळात जेवण ( भात कमी खावा) (सलाड भरपूर खावे )
वर्ज्य काय ?
नारळ पाणी , नारळ, गोड पदार्थ , बेकरीतील पदार्थ , मैदा , तेलकट पदार्थ
वर्ज्य फळे : केळ , चिकू , फणस,आंबा ,द्राक्ष ,सीताफळ
( वर दिलेल्या गोष्टी व्यक्ती सापेक्ष बदलू शकतात . परंतु या आहाराचा विचार आपल्या तब्बेतीच्या योग्यते प्रमाणे नक्की करू शकता . बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या . )
मांसाहार करत असाल तर विडीओ आवर्जून पहा

Monday, October 5, 2015
बटाटा कसा खावा ?
डॉ. जितेंद्र घोसाळकर
बटाटे >>>>
====
जगभरात सर्वत्र आढळणारी, जास्त वापरली जाणारी भाजी म्हणजे बटाटा. बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या आवडीची अशीही भाजी. सर्वांच्या आवडीचे कारण म्हणजे चविष्ट आणि पौष्टिकपणा. बटाटा खाल्ल्याने फॅटचे प्रमाण वाढते असे अनेक जणांचे मत आहे. पण असे नाहीये, यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस तत्व आढळून येते. बटाटा स्किन हेल्थसाठीसुद्धा उपयुक्त आहे.
बटाटे उकडून घेतल्यानंतर शिल्लक पाण्यामध्ये एक बटाटा बारीक करून, या मिश्रणाने केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतील. तसेच केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. डोक्यात खाज, केस पांढरे होणे, टक्कल या समस्याही दूर होतील.
वजन कमी करण्यात सहायक -
वजन कमी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला उकडलेले बटाटे थोडेसे मीठ टाकून काह्याला दिल्यास लाभ होईल. वजन बटाट्यामुळे वाढत नाही तर बटाटे तळण्यासाठी वापरल्या जाणार्या तेल-तुपामुळे वाढते. कच्चे बटाटे शिजवून तेल-तुपान न तळता खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. एका सामान्य आकाराच्या बटाट्यामध्ये 168 कॅलरी,5 ग्रॅम प्रोटीन आणि 3 ग्रॅम फायबर असते. काही जणांच्या मते जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन डायजेस्ट करण्यासाठी त्रास होतो. असे आजीबात नाही, तुम्ही जर डायटिंग करत असाल तर, बटाट्याचे सेवन करणे तुमच्यासाठी बेस्ट डाएट आहे. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.
उच्च रक्तदाब ( हाय ब्लड प्रेशर) नॉर्मल करण्यासाठी -
उच्च रक्तदाबाशी संबंधित रुग्णांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन करणे लाभदायक ठरते. बटाटा पोटॅशियमचा चांगला स्रोत असून यात केळीपेक्षा जास्त प्रमाणात पोटॅशियम आढळते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यातून(सालीसह) दररोजची 18 टक्के पोटॅशियमची गरज भागवली जाते. पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो.
अॅसिडिटी नियंत्रणात येते -
मध्यम आकराच्या बटाट्याचा रस तयार करून दररोज याचे सेवन केल्यास पाचन तंत्र ठीक होण्यास मदत होते. या रस सेवनाने अॅसिडिटी नियंत्रणात राहते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार बटाट्याचा रस घेतल्याने अल्सर ठीक होण्यास मदत होते. यात असणारे अँटीऑक्सीडंट्स आतडे आणि पचन प्रणालीतील आग कमी करतात.
झोप लागत नसेल तर -
ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या असेल त्यांनी उकडलेल्या बटाट्यांचे सेवन अवश्य करावे. बटाटा पोटातील आम्ल तत्वांचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. आम्लाच्या प्रभावामुळे झोप अनियंत्रित होते. झोपण्यापूर्वी एक उकडलेले बटाटे आणि एक ग्लास दुध घेतल्यास शांत झोप लागेल.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते -
सर्वांनाच माहिती आहे की, बटाट्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. कच्चा बटाटा बारीक करून एक चमचा रस दिवसातून कमीतकमी चार वेळेस घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे शरीराला विविध प्रकारच्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. बटाट्यामुळे थकवा, कमजोरी कमी होण्यास मदत होते.
त्वचा उजळते -
बटाट्याचा उपयोग त्वचा उजळ करण्यासाठीही केला जातो. ताजे बटाटे बारीक करून चेहर्यावरील पुरळ, फोड, काळ्या डागांवर लावल्यास लाभ होतो. ताज्या बटाट्याच्या रसाने चेहरा धुतल्यास विविध प्रकारचे डाग नष्ट होण्यास मदत होते. डोळे सुजले असल्यास त्यावर कच्चा बटाटा ठेवा, आराम मिळेल.
मुळव्याधीत आराम -
ताज्या बटाट्याचा रस मुळव्याधीच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. मुळव्याध झालेल्या व्यक्तीने दररोज एक ग्लास बटाट्याच्या रसाचे सेवन करावे तसेच हा रस प्रभावित अंगावर लावावा.
रक्ताल्पता (अॅनीमिया) -
बटाट्यामध्ये आयर्न (लोह) तत्व भरपूर प्रमाणात असते. हे तत्व लाल रक्तपेशी निर्माण करण्यास अत्यावशक असते. यामुळे अॅनीमिया रोगापासून दूर राहण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे. पाताळकोट येथील हर्बल जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार बटाट्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
ताजे बटाटे बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट एखाद्या जखमेवर किंवा जळलेल्या भागावर लावल्यास त्वरित आराम मिळेल. ताज्या बटाट्याची साल भाजलेल्या अंगावर ठेवल्यास आराम मिळेल. जळलेल्या जखमेवर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर बटाटा यावर रामबाण उपाय आहे. बटाट्यामुळे इन्फेक्शन कमी होईल.

Wednesday, September 23, 2015
गणपती मानस पूजा
कृपया हा विडीओ पाहताना स्पीकर चालू ठेवा . माझ्या आईने तिच्या आई कडून शिकलेली गणपतीची मानस पूजा खास संग्रही राहावी म्हणून इथे शेअर करत आहे.
श्री गणेश प्रसन्न
उंदीराचे वाहन , बसे गजानन
दिसे शोभे महान मूर्ती त्याची
मूर्ती ऐ साजिरी दिसते गोजिरी
पायाची घागरी वाजत असे
पायी घागरिया कटी करगोटा
शोभे बारवटा गणराज
आखूड हि मांड्या विशाल हे दोंद
म्हणती वक्रतुंड नाव त्याचे
वक्रतुंड म्हणुनी केला ,दंडवत दुर्वांचा मुकुट वाहियेला
दुर्वांचा मुकुट शोभतो मस्तकी ,गणपती जगजेठी पहावा दृष्टी
दुर्वांची जुडी शीर हे कमळ , वाहिले तत्काळ गणपतीशी
चंदनाचा टिळा अक्षत सुढळा , गणपती सावळा पहावा डोळा
कुडीची समई प्रेमाचे जे तेल , ज्ञानाचा जो दीप लावियेला
ज्ञान दीप लावूनी भक्ती नैवेद्य अर्पिला , दोन्ही हाती विनविला गणपतीशी
दोन्ही हाती विनविता आराधना झाली , निद्र बहु आली गणपतीशी
देहाचा पलंग आयुष्याची शेज , शंकराचा बाळ निजविला
शंकराचा बाळ झालासे प्रसन्न , चुडे दान देतो सवाष्णीना
संकटी पावतो निर्वाणी धावतो , उडी हि घालतो भक्तालागी
ब्रम्हा ,विष्णू , महेश शिव नाही दुजा , संकटी पुजावा गणराज
गणपतीची पूजा भक्तीचे पोवाडे , मुक्तीची कवाडे उघडली
गणपतीची पूजा गाती ऐकती , त्यास देईल मुक्ती गणराज
तुझे चरण असो कृष्णाच्या हृदयी , सदाकाळ ठेवी चरणापाशी
चरणा पासुनी न ठेवावे दुरी , दासी तुझी खरी गजानना
मंगलमूर्ती मोरया!

Saturday, August 1, 2015
मोराची चिंचोली : दुसरा भाग
मोराची चिंचोली : पहिला भाग
मोराच्या चिंचोलीला कस पोचाल ?
पुणे ते चिंचोली मोराची

आगावू बुकिंग करण्या करिता तुम्ही ९८२३३४७२३३ / ९६२३२५२४४४ /९६६५८३७७७७ वर संपर्क करू शकता . पर्यटन केंद्रात मोर पाहण्यासाठी मयुर कट्टा बांधलेला आहे . सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे मोर सहज पाहायला मिळतात . बैलगाडी आणि ट्रक्टर सफारीचा आनंदही घेत येतो . पर्यटन केंद्रात
किल्ल्यांची आणि अंतराळाविषयी महिती देणारा एक छोटे खानी विभाग पाहायला मिळतो . ग्रामीण जन जीवन दर्शवणारे देखावे तसेच शेतीची अवजारे पाहायला मिळतात
काळीशार जमीन , शुद्ध हवा , मोजकीच लोक वस्ती , प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या या भागत राहणारी माणसंहीमनाने निर्मळ आहेत . मल्हारी मार्तंडा वर निस्सीम भक्ती असणारी हि लोक सकाळी देवातार्चनाला जाताना दिसतात . मोर पाहण्याचा खरा आनंद इथे घ्यायचा असेल तर किमान एक रात्र तरी राहावे लागते . मोर सकाळी ६.० ते ८.०० वाजे पर्यत तर संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजे पर्यंत पाहता येतात . शेतात फिरून मोर पाहणे फारच विलोभनीय अनुभव ठरतो . सकाळी मोर झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सभोवताल चे निरीक्षण करताना दिसतात . भल्या पाहटे पासून त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग येते.
गावात फिरताना बर्याच जुन्या विहिरी पाहायला मिळतात. पाण्या अभावी अशा कोरड्या विहिरीन मध्ये बया पक्षी आपले घरटे बांधताना दिसतो . त्याला पाहणे खरच मन मोहून टाकणारा अनुभव असतो .
रांजण खळगे पाहून झाले कि रांजण गावाच्या महागणपतीच दर्शन आवर्जून घ्या
अतिशय दुर्गम भाग आणि पाण्याचा अभाव असूनही गावकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करावे तितके कमी आहे .
कृत्रिम तलाव तयार करून शेती करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे .
मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे परंतु त्याचे सहजतेने दिसणे आज काल दुर्मिळ झाले आहे . परंतु या गावात अडीच हजार मोरांची वस्ती आहे आणि इथले शेतकरी पुढाकार घेऊन त्यांचे रक्षण करत आहेत हि खरच अभिमानाची गोष्ट आहे .
चला तर मग कधी निघताय मोराच्या चिंचोलीला ? शुभ यात्रा !!!
वरील दोन्ही भागांबद्दल अभिप्राय नक्की कळवा ……….
मोराच्या चिंचोलीला कस पोचाल ?
पुणे ते चिंचोली मोराची
मुंबई ते मोराची चिंचोली
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची उत्तम व्यवस्था होते . रुपये १५०० ( एका व्यक्ती करिता ) आकारले जातात . त्यात रहायची सोय तसेच आपण पोहचू त्यादिवशीचा नाश्ता , जेवण आणि संध्याकाळी उपहार तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्ट्या पर्यंतची सोय होते . दुसऱ्या दिवशी जेवण व्यवस्था हवी असेल तर अतिरिक्त पैसे आकारले जातात .
आगावू बुकिंग करण्या करिता तुम्ही ९८२३३४७२३३ / ९६२३२५२४४४ /९६६५८३७७७७ वर संपर्क करू शकता . पर्यटन केंद्रात मोर पाहण्यासाठी मयुर कट्टा बांधलेला आहे . सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे मोर सहज पाहायला मिळतात . बैलगाडी आणि ट्रक्टर सफारीचा आनंदही घेत येतो . पर्यटन केंद्रात
किल्ल्यांची आणि अंतराळाविषयी महिती देणारा एक छोटे खानी विभाग पाहायला मिळतो . ग्रामीण जन जीवन दर्शवणारे देखावे तसेच शेतीची अवजारे पाहायला मिळतात
काळीशार जमीन , शुद्ध हवा , मोजकीच लोक वस्ती , प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या या भागत राहणारी माणसंहीमनाने निर्मळ आहेत . मल्हारी मार्तंडा वर निस्सीम भक्ती असणारी हि लोक सकाळी देवातार्चनाला जाताना दिसतात . मोर पाहण्याचा खरा आनंद इथे घ्यायचा असेल तर किमान एक रात्र तरी राहावे लागते . मोर सकाळी ६.० ते ८.०० वाजे पर्यत तर संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजे पर्यंत पाहता येतात . शेतात फिरून मोर पाहणे फारच विलोभनीय अनुभव ठरतो . सकाळी मोर झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सभोवताल चे निरीक्षण करताना दिसतात . भल्या पाहटे पासून त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग येते.
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील नव्याने तयार होणारे नक्षत्र वनहि पाहण्या सारखे आहे .
मला आवडलेल्या मोरांच्या काही हालचाली या विडीओ मध्ये चित्रित केल्या आहेत
मोरांसह इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते . किकीर्डे , खंड्या, बया पक्षी , खार , भारद्वाज, कबुतरं सहज दिसतात . भाजी पाल्याची शेतीही केली जाते . शेपू, मेथी , कोथिंबीरी सारख्या ताज्या भाज्या सहज मिळतात. दाट आमराई आणि डाळींबा च्या बागा जागोजागी पाहायला मिळतात .
तुम्ही झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंदही या परिसरात घेऊ शकता .असा झोपाळा तुम्हाला म्हाळसाकांत कृषी पर्यटन केंद्रात पाहायला मिळतो झोपल्यावर झुलत गरम गरम कांदा भज्यांचा आस्वाद घेता येतो
शेतात ओरडणारे , रुबाबात चालणारे मोर पाहताना मन वेगळ्याच आनंदाच्या विश्वात निघून जात. झाडाच्या शेंड्यावर बसून एकमेकला आरोळी देणारे मोर जेव्हा शेताच्या दिशेने उडू लागतात तेव्हाचे दृश्य अतिशय मन मोहक असते. तुम्हा सर्वासाठी रेकॉर्ड केलेले काही खास मोराचे विडीओ इथे पोस्ट करत आहे .
गावात फिरताना बर्याच जुन्या विहिरी पाहायला मिळतात. पाण्या अभावी अशा कोरड्या विहिरीन मध्ये बया पक्षी आपले घरटे बांधताना दिसतो . त्याला पाहणे खरच मन मोहून टाकणारा अनुभव असतो .
रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन आणि निघोज कुंड /रांजण खळगे पाहण्यासाठी साधारण २० किलो मीटर
अंतर पार करावे लागते . गावकरी तिथ पर्यंत जाण्याकरिता उत्तम मार्गदर्शन करतात . स्वतःचे वाहन
असेल तर हा प्रवास फारच सुखकर होतो .या निघोज कुंडाचा विडीओ खास तुमच्या साठी
अनेक वर्षांपूर्वी तयार झालेले हे रांजण खळगे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि त्यांचे तयार होणे आजही एक गुपित आहे .
| Ranjangaon Mahaganapati Mandir |
| रांजणगाव महागणपती मंदिर |
अतिशय दुर्गम भाग आणि पाण्याचा अभाव असूनही गावकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करावे तितके कमी आहे .
कृत्रिम तलाव तयार करून शेती करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे .
मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे परंतु त्याचे सहजतेने दिसणे आज काल दुर्मिळ झाले आहे . परंतु या गावात अडीच हजार मोरांची वस्ती आहे आणि इथले शेतकरी पुढाकार घेऊन त्यांचे रक्षण करत आहेत हि खरच अभिमानाची गोष्ट आहे .
चला तर मग कधी निघताय मोराच्या चिंचोलीला ? शुभ यात्रा !!!
वरील दोन्ही भागांबद्दल अभिप्राय नक्की कळवा ……….
Sunday, July 26, 2015
मोराची चिंचोली : भाग पहिला
नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .
शुद्ध हवा , प्रदूषण रहित गाव आणि सुखद वातावरण मनाला मोह पाडते . हा प्रदेश तसा कमी पावसाचा असल्याने ठराविक पिक घेतली जातात पण आत्ता गेलात तर डाळींबाच्या ,केळ्याच्या बागा फुललेल्या दिसतात
. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?
या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव विरळाच असतो
मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो . नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच आहे . मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !
मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .
| Morachi Chincholi |
| Morachi Chincholi |
| Morachi Chincholi |
. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?
या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव विरळाच असतो
| Peacock at the top of tree in Morachi Chincholi मोराची चिंचोली |
मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो . नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच आहे . मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
![]() |
| मोराची चिंचोली बया पक्षी |
म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !
मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
| रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड |
| रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड |
अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल
Labels:
अर्थ,
निघोज,
मळगंगा कुंड,
महागणपती,
मोर,
मोराची चिंचोली,
रांजण खळगे,
रांजणगाव
Tuesday, July 14, 2015
जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे
जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे -
पचन सुधारते
जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.वजन घटवण्यास मदत होते
जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}
लवचिकता वाढवते
पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते
जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते
दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.
शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते
शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.
दीर्घायुषी बनवते
ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.
गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात
पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.
चंचलता कमी होते
मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.
हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो
काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.
Labels:
अर्थ,
अर्धपद्मासन,
आयुर्वेद,
आयुष्य,
आरोग्य,
ऋजुता दिवेकर,
चरबी,
पचन,
वेगस नर्व्ह
Wednesday, July 1, 2015
लांब लांब रांग!
अजूनही आपल्या आसपास किती जण फोन बिल / वीज बिल / विम्याचे हप्ते / महानगर पालिकेचे कर / बँक रिकरिंग किंवा पी पी फ चे पैसे रांग लावून भरतात ? तर उत्तर असेल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक . परवाच पोस्टात काही कामा करिता गेले असता तिकडे वीज बिल भरणार्यांची भली मोठी रांग पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं . आत्ताच्या युगात असे सगळे व्यवहार पार पाडण्यासाठी विविध पद्धतींचा सहज वापर करता येत असूनही आपण रांग लावण्यातआपल्या वेळचा अपव्यय का करावा ? सहजच विचार मनात आला कि महिन्या भरात लोकं अशा किती ठिकाणी रांगेत उभे राहत असतील आणि असे उभे राहण्याचे तास मोजले तर किती होत असतील . मुख्य म्हणजे आयुष्याचे बरेचसे तास अश्या लोकांना रांगेत उभ राहवून वाया दवडावे लागतात . काही वेळा तर अतिमहत्वाची कामे बाजूला सारून अंतिम देय तिथी नजीक आल्याने अशा रांगांना तोंड द्यावे लागते . अनेक वेळा तर तासंतास उभ राहून आपली वेळ येताच खिडकी बंद होण्याची वेळ येते व त्या दिवशीचा सगळा वेळ वाया जातो .
जे कुणी माझे हे विचार वाचत असाल त्यांना नक्कीच इंटरनेट वापरण्याची सवय असेल . आता तुम्हीच विचार
करा कि तुम्ही तुमचे जे व्यवहार अशा रांगा टाळून करता येतील ते सगळे व्यवहार आधुनिक पद्धतीने पूर्ण करता का ? करत असाल तर उत्तमच पण करत नसाल तर लगेच विचार करा कि तुम्ही
आज पर्यंत रांगेत किती वेळ वाया घालवलात ? आणि पुढेही किती वाया घालवणार आहात ?
मी तर म्हणेन कि जर तुम्ही या सगळ्या व्यवहारांशी परिचित असाल तर आपल्या आस पास वावरणाऱ्या लोकांना याचे महत्व पटवून द्या/जमणार असेल तर त्यांना मदतही करा . ज्या योगे त्यांचाही वेळ वाया जाणार नाही आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जीवनात इतर गोष्टी करण्याकरिता लागणारा वेळ आणि उर्जा ते वाचवू शकतील , त्यांचे स्वास्थ्य हि उत्तम राहील . एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !
Friday, May 29, 2015
कहाणी लंडन च्या आजीबाई ची ~~~ राधाबाई ची
एका बेफाम जिद्दीची गोष्ट.
१९४८/४९ .
राधाबाई,
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.
एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.
बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.
..........आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
पु ल, अत्रे, यान पासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.
त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा मेयर हजर होता.
........ आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.

Subscribe to:
Posts (Atom)