Sunday, March 29, 2015

किचन टिप्स

स्वैपाकघरातील महत्वाच्यी टीपा
आजीचे अनुभवी सल्ले .
१.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.
२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.
३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.
४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.
५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.
६.बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.
७.हिंगाचा वास टिकवीण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.
८.डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.
९.दुधाला वीरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.
१०.भाज्यांमध्हे मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकन्यास मदत होते.
११.भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही.
१२.पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात.
१३.छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात.
१४.कट्ट्यावर लिम्बाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
१५.कढ़ीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढ़ीलिम्बाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात.
१६.गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.
१७.कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड  पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.
१८.पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
१९.शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.
२०.पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.
२१.शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
२२.भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
२३.खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
२४.एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
२६.पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.
२७.पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.
२८.शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
२९.फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
३०.रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
३१.पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
३२.हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो.
३३.ताक आम्बट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद
काढून टाकावे. आम्बटपणा कमी होईल.
३४.ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
३५.ड्राई फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी १ तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
३६.कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
३७.कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात १ चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
३८.भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.
३९.पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा.
४०.दोस्याच पीठ हिवाळयात आम्बवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.
४१.लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते.
४२.हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.
४३.कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा.
४४.लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैन मधे कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.
४५.लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजि दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
४६.वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
४७.करंजी, शंकरपाळ, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव। पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
४८.अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोड़ी तांदळlची पीठी मिसळlवी.
४९.अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोड़ी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.
५०.घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
५१.घराच्या कोपरया मध्ये बोरिक पावडर टाकून कॉक्रोचेस ला पळवता येइल.
५२.मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.
५३.कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
काय मग? कशा काय वाटल्या ह्या किचन टिप्स?
कळावे..

Friday, March 6, 2015

होळी रे होळी पुरणाची पोळी

होळी आणि धुळवड दोन्हीही आपण मोठ्या उत्साहात साजरी केली असेल . कधी नव्हे ते या वर्षी
होळी आधी पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात पुन्हा एकदा गारवा निर्माण झाला .
अचानक बदललेल्या वातावरणाने एक नवीन उत्साह निर्माण केला . त्यावेळी खर्या अर्थाने
जाणवलं कि आपण कितीही  आधुनिक झालो आणि निसर्गा पासून दूर गेलो तरी त्याच आणि आपल
नात अतूट आहे आणि आपण त्याच्यावर कितीही अन्याय केला तरी तो आपल्यावर प्रेम करणं सोडत
 नाही .
अशा पूरक वातावरणात सण साजरा करण्याच आणखी एक महत्व असतं ते म्हणजे या सणाच्या
अनुशंघाने जी पक्वान्न आपण घरी तयार करतो ती खाताना आणि सहकुटुंब भोजन करताना एक
वेगळा सुखद अनुभव मिळतो . तुम्हीही पुरण पोळी ,कटाची आमटी ताव मारून खाल्ली असेल , मी
हि खाल्ली कारण "घरच्या अन्नाची चवच न्यारी आणि त्यामुळे कुटुंबही खुश , लई भारी "!

विनोदाचा भाग सोडला तर एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते कि आजकाल कुटुंबात पक्वान्न बाहेरून
मागवण्याचा कल वाढलेला दिसतो . कामाच्या व्यस्तते मुळे  किंवा बदललेल्या जीवनशैली मुळे पदार्थ
घरी करण्याची इच्छा कमी झालेली दिसते . माझी सर्व महिला आणि महिलांना स्वैपाकघरात मदत
करणाऱ्या पुरुषांनाही कळकळीची विनंती आहे कि निदान जमेल तेव्हा जमेल त्या सणाला नेहमी जमणार
नसेल तर कधीतरी पक्वान्न घरी करायचा प्रयत्न करा . आपल्या मुलांनाही अशा वेळी मदती साठी
सामील करून घ्या . एकत्र येउन जेवण करा आणि घरच्या अन्नाचा आस्वाद घ्या . तुमच्या नक्की लक्षात
येईल कि अस केलेला स्वैपाक आणि त्या नंतर केलेल सहकुटुंब भोजन हे अनेक वेळा आयत्या आणलेल्या
पदार्थान पेक्षा एक वेगळी आपुलकी देणारा अनुभव असेल. त्याने कुटुंबातील प्रेम तर वृद्धिगत होईलच पण
एकमेकांसाठी एकत्र येउन काम करण्याची वृत्ती कुटुंबात वाढेल .

तुम्हा सगळ्यांसाठी खास पुरणपोळीचा विडीओ इथे शेअर करत आहे . पुष्कळ वेळा
आयती बाजारातून आणलेली पुरणपोळी हि मैदा आणि साखर घालून केलेली असते कारण ती करायला
सोपी आणि स्वस्त पडते . पण तुम्हाला जमेल तेव्हा घरची पुरण पोळी हि गव्ह्च्या पिठात (कणिक)
आणि गुळ वापरून करण्याचा प्रयत्न करा . हि पोळी आरोग्यासाठी उत्तम ठरते आणि मैद्या पासून

साखरे पासून  होणारे दुष्परिणाम हि टाळते. मग काय आता करून बघणार ना अशी पुरण पोळी !

Friday, December 19, 2014

मकर संक्रांत (नातं पौष महीन्याच)



पौष महिना हा खर तर परंपरेनुसार  "वर्ज्य " महिना समाजाला जातो. कोणत्याही चांगल्या कामाची सुरवात
पौष महिन्यात करत नाहीत असं म्हणतात . त्यामुळे लग्न,वास्तुशांती खरतर शेतीची नव्याने करण्याची कामही या महिन्यात करत नाहीत . पण गम्मत अशी कि सगळी उत्तम काम बाजूला असली तरी या संक्रमण काळात येणाऱ्या संक्रांत सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा सण फार आनंदात उत्साहात साजरा केला जातो . शरीराला आणि मनाला आलेली  मरगळ या सणाच्या आनंदात दूर पळून जाते . गुळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू , खसखशीचा हलवा , नवं वधूचा पहिला संक्रांत सण  तर काळी चंद्रकला आणि हलव्याचे दागिने घालून साजरा होतो . हा महिना खरतर महिलांना एकत्र आणणारा ! संक्रांतीच हळदीकुंकू फार आनंदात आणि प्रेमाने साजरं केलं जात .वेगवेगळ्या वस्तू लुटून स्त्रिया या वेळी दानाच पुण्य मिळवत असतात . अशावेळी आपल्या संस्कृतीच कौतुक करावस वाटत . एकत्र येण्याची , परस्परांच्या आनंदात सामील होण्याची , दान देऊन ज्याला शक्य नाही त्यालाही योग्य आदर आणि सन्मानाने मदत करून सण  साजरा करण्याची संधी देण्याची शिकवण आणखी कुठूनही सहजतेने मिळू  शकत नाही . असे सण ,संस्कृती आणि परंपरांतून आपल्यावर होणारे संस्कारच आपल्याजगण्याला आणि जीवनाला सुंदर अर्थ देऊन जातात .
रांगोळी हा प्रत्येक सणाचा अविभाज्य भाग आहे आणि भारतीय संस्कृतीत त्याला अनन्य साधारण महत्व आहे .
                                           

आजही रोज रांगोळी काढून घराचे उंबरे आणि अंगण सजवण्याची पद्धत आपल्या देशात अबाधित आहे याचे
कौतुक करावे तितके थोडे . याच पूर्ण श्रेय जात भारतीय स्त्रियांना आणि त्यांच्यातील कलात्मकतेला !
ज्यांना रोज रांगोळी काढणे शक्य नाही अशा स्त्रियाही सणाच्या दिवशी वेळात वेळ काढून रांगोळी काढताना
दिसतात . पौष महिन्यात रांगोळी काढण्याला विशेष महत्व आहे. रांगोळी हे केवळ एक कलेच प्रतिक नसून
रांगोळी काढण्याचा मन , बुद्धी,शरीर मुख्यत्वे एकाग्रतेशी जवळचा संबध आहे . माझ्या वाचनात असेही
आले आहे कि रांगोळीत काढल्या जाणार्या भूमितीय आकारांचा आपल्या मेंदूच्या पेशींवर उत्तम परिणाम होतो
ज्या योगे व्यक्ती उत्साही ,आनंदी होते आणि त्याचा आरोग्य सुधारण्यात हातभार लागतो . तसेच हि
रांगोळी तुमच्या घरी प्रवेश करणाऱ्या सर्वच आप्तांना प्रसन्न करते .
रांगोळी शिकावी आणि ती उत्तम काढता यावी अशी प्रत्येक स्त्री ची सुप्त इच्छा असते . हि इच्छा काही
वेळा पूर्ण होते तर काही वेळा व्यस्त जीवन पद्धती मूळे स्त्रिया मनात असूनही अशा गोष्टींसाठी वेळ
देऊ शकत नाहीत . या साठी मी एक उपाय शोधला आहे . या संक्रांतीला तुमची इच्छा असेल तर तुम्ही
स्वतः अशी छान रांगोळी घालू शकता किंवा तुमच्या मैत्रिणीलाही शिकवू शकता . कसं ? फारच सोप आहे
खास संक्रांति करता एका नवीन स्वरुपात आम्ही रांगोळी डीवीडी तुमच्या साठी घेऊन येत आहोत .
संक्रांतीला लुटण्या साठी किंवा भेट वस्तू देण्या साठी आमच्या रांगोळी डीवीडी  आम्ही तुम्हाला स्वस्त दराने
उपलब्ध करून देणार आहोत . आमची प्रत्येक डीवीडी फक्त रु.१०० मध्ये उपलब्ध होईल *
*( कमीत कमी २५ डीवीडी च्या खरेदीवर हि सूट लागू होईल )
या डीवीडी मध्ये नक्की काय असेल ?
यात बेसिक रांगोळ्या , रंगीत रांगोळ्या , मोठ्या परिसरात ,लहान परिसरात काढता येण्या सारख्या
सर्व रांगोळ्यांच प्रात्यक्षिक तुम्हाला पाहता येईल व शिकता येईल . रंग कसे भरावे , मोराच्या रांगोळ्या
कलश , स्वस्तिक यांचे कलात्मक नमुने कसे तयार करावेत याचं प्रात्यक्षिक पाहता येईल . मुख्य म्हणजे
अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी तुमच्या घरी बसून , तुमच्या सवडीने शिकू शकता . चला तर मग मला
संपर्क साधा ८१०८१०१५२४ (8108101524) { नमुन्यादाखल विडीओ या लिंक वर पहा www.youtube.com/c/kshamabade आणि आजच आपल्या संक्रांति सणाला लुटण्या करिता रांगोळी डीवीडी (कमीत कमी  २५ डीवीडी )ची नोंदणी करा .
(हि सवलत फक्त भारतीयांसाठी उपलब्ध आहे )

Wednesday, November 19, 2014

साडेसाती


साडेसाती  हा शब्द सहज उच्चारायलाही लोक भितात . आता माझ्या राशीला साडेसाती येणार ह्या नुसत्या कल्पनेनी लोकं अर्धी खचून जातात .
खरच का साडेसातीतच असताना आपल्याला त्रास होतो? साडेसाती नसते त्या वेळी खरच का आपल्याला एकही संकटाचा सामना करावा लागत नाही?
तर याच उत्तर "नाही " अस आहे . साडेसातीच्या केवळ कल्पनेने जर आपण व्याकुळ होऊ लागलो तर खरच साडेसाती आल्यावर आलेल्या संकटांचा सामना आपण योग्य रीतीने करू शकू का याचा विचार करणे गरजेचे आहे .  हे सर्व लिहिण्याच कारण - तुम्ही कधीऑनलाईन भविष्य सांगणाऱ्या साईट चा वापर केला असेल तर लक्षात येईल . काही दिवसां पूर्वी माझ्या एका मैत्रिणीने एका ऑनलाईन भविष्य सांगणाऱ्या वेबसाईट वर आपले नाव सर्व तपशीला सह रजिस्टर केले . संपूर्ण नवीन वर्षाच तुमच्या राशीच भविष्य फुकटात मिळेल असे लिहिल्या मुळे तिला सहजच भुरळ पडली . आपला ई -मेल रजिस्टर केला कि असे साईट वाले एकदाच सर्वसाधारण भविष्य फुकटात सांगून आपला कसा गैर फायदा घेतात याचे ती एक उत्तम उदाहरण ठरली . तिला हवे तसे वर्षाचे भविष्य लगेचच तिच्या ई -मेल वर मिळाले पण त्या नंतर त्या वेब साईट  वरून येणाऱ्या मेल ची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली . परंतु आता येणारे मेल हे तिला तीच जीवन जगण्यासाठी उपयोगी पडावे अशा भविष्याचे नसून अमुक एक ग्रह त्याचे स्थान बदलत असताना तिच्या जीवनात कशी उलथापालथ करणार आहे या बद्दल चे असत . अस ग्रह्संक्रमण होत असताना तुम्हाला काय करा आणि काय करू नका हे सांगण्या करिता असे भविष्यवेत्ते , प्रत्येक ग्रहा  मागे ठराविक त्या ग्रहाच्या दर्जा प्रमाणे भविष्य सांगण्याची किंमत आकारतात . काही वेळा हा ग्रह तुमच्या आयुष्यात कस छान घडवणार आहे आणि त्यातही आमच्याकडून मार्गदर्शन घेतल्यास तुम्हाला कस घबाड मिळेल अशा तर्हेचे  तर काही वेळा हा ग्रह तुमच्या आयुष्याची कशी वाट लावणार आहे आणि ते थांबवायचे असेल तर आमच्या कडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे अशा आशयाचे संदेश येत राहतात. साडेसाती संदर्भात एक अतिमहत्वाच्या अशा शनि ग्रहाबद्दल चा मेल तिला मिळाला . आता शनि आपल स्थान बदलत आहे आणि तुमच्या राशीला लवकरच साडेसाती सुरु होत आहे तेव्हा सावधान . तुम्ही येणाऱ्या संकटा  साठी तयार आहात का? लवकरात लवकर आमच्या खास साडेसाती बद्दल मार्गदर्शन देणाऱ्या  Package साठी पैसे भरा आणि मौल्यवान मार्गदर्शन मिळावा . (Package चा दर बघूनच माणूस धारातीर्थी पडतो ) . हे सगळं वाचून तीने आपला सुखाचा जीव दुक्खात लोटला . ती बेचैन झाली . तिला हातातलं काम सुचेना . माझ कस होणार साडेसातीत हा एकाच विचार ! कुणाला तरी या बद्दल सांगाव आणि जर वाटल तर त्या Package साठी पैसे भरावेत असा विचार तिने केला आणि हि गोष्ट तिने मला सांगितली .  मला विचारण्या आधीच ती पैसेही भरून मोकळी झाली होती पण त्या तथाकथित मार्गदर्शनाने ती आणखीनच कासावीस झाली होती. आता हे सगळ वाचल्यावर तुम्हीच सांगा ती साडेसाती पुढे केव्हा तरी सुरु होईल या वर तुमचा विश्वास बसतो आहे का? अहो कारण ती तिच्या मनात केव्हाच सुरु झाली होति. खर ना ?  या बद्दल तुम्हा सर्वांचा अनुभव काय? नक्की कळवा 

Friday, October 17, 2014

दिवाळी रांगोळी

रांगोळी प्रेमिंकरता खुश खबर! शिका रांगोळी घर बसल्या!
या वर्षी काहीतरी नवीन शिकायचं आहे ? दिवाळी करिता खास रांगोळी
काढायची आहे तर मग आजच आपली DVD बुक करा . चित्रात दाखवलेली ऑफर
फक्त २० तारखे पर्यंत उपलब्ध ! संपर्क करा 8108101524

Tuesday, September 30, 2014

संस्कार भारती रांगोळी वर्कशॉप

शिका रांगोळी खास दिवाळी करिता

रंग रंगाने रंगली ती रंगावली , धरती नटली ,खुलली, हसली
दिवाळी रंगाने सजली ,समाधानाने फुलली आणि प्रेमाने बहरली
खरच असा अनुभव देते दिवाळीला दारात काढलेली रांगोळी !
तर मग त्वरा करा, या शिका आणि जाणून घ्या सुंदर रांगोळी काढण्याची कला !

Saturday, July 5, 2014

अखेर Orkut Shutdown झालं !

साधारण २००६ चा काळ । अग तू  ओर्कुट वर आहेस का? आहेस न मग मला Add कर ना सगळी भावंडे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी एका वेळी भेटतील अस ठिकाण म्हणजे Orkut! अस समीकरण झाल होत.   जीवनातील लहान सहान गोष्टींचे देखील शेयारिंग त्यामुळे वाढीला लागल होतं . एका क्षेत्रातील लोक एकत्र येण्याकरिता वेग वेगळ्या Community , Orkut  वर तयार केल्या जात होत्या विविध विषयांवरची माहिती सहज शेयर होऊ लागली होती .  खरतर घराघरात इंटरनेट येण्याच Orkut एक मुख्य कारण होत असं  म्हणायला हरकत नाही . आज सकाळी अचानक Orkut चा मेल पाहून अश्च्यार्य वाटलं . आणि ते Shut down  होणार हे वाचून पुन्हा एकदा लोग इन करायचा मोह झाला . जुने Scraps आणि फोटो , जुन्या Communities  वरची पोस्टिंग वाचून मन पुन्हा भूत काळात रमून गेलं . अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . नवीन ओळखी झाल्या ज्या आजही टिकून आहेत किंबहुना मैत्री दृढ झाली आहे .आजही ती माणस फेसबुक च्या माध्यमातून संपर्कात आहेत पण माध्यम बदलल आणि नाविन्य हि संपलं आहे . हळू हळू फेसबुक ला सुधा  माणस कंटाळू लागली आहेत .  प्रत्येक गोष्ट जी जन्माला येते तिचा शेवटही होतोच या तत्वाने आज ओर्कुट चा हि शेवट होताना आपण पाहत आहोत . असा शेवट करतानाही आपल्या चाहत्यांच्या भावनांचा आणि मनाचा विचार करत Orkut ने Data Archive  करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे ज्या योगे आपण आपल्या जुन्या आठवणी फाईल मध्ये साठवून ठेवू शकतो .  A Farewell to Orkut  या विषयाचा मेल काही दिवसातच तुमच्या पर्यंतही पोचेल आणि तुम्हालाही भूत काळातील आठवणीत घेऊन जाईल या बद्दल मला खात्री आहे . सप्टेंबर २०१४च्या ३० तारखेला तुम्हाला तुमच शेवटच Scrapलिहिता येईल आणि सप्टेंबर २०१६ पर्यंत तुमचा Data Archive करून घेता  येईल चला तर तयार व्हा आपली भुली बिसरी यादे ताजा करण्या साठी आणि त्यांच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी , जाता जाता ओर्कुट ला मनापासून धन्यवाद!