Saturday, July 5, 2014
अखेर Orkut Shutdown झालं !
Saturday, June 14, 2014
गरिबी आणि श्रीमंती
![]() |
| Sun & Rain |
जीवनात गरिबी आणि श्रीमंती हा उन पावसाचा खेळ आहे . गरिबी जीवन घडवायला शिकवते तर श्रीमंती जीवन जगायला शिकवते.
गरिबीत सांभाळलेला प्रामाणिकपणा श्रीमंतीत सन्मान,आदर मिळवून देतो . गरिबी आणि श्रीमंती ह्या जीवन चक्राशी निगडीत गोष्टी आहे.
या दोन्ही परिस्थितीत आपल्याला सतत साथ देते ते आपले आरोग्य / आपली तब्बेत !
गरिबीत आपण प्रयत्नपूर्वक मन शांत, समाधानी आणि प्रसन्न ठेवून
स्वतःच्या आणि आपल्या बरोबार्च्यांच्या तब्बेतीची नकळत काळजी घेत असतो .
व्यायाम करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी पैशांची
आवश्यकता नसते तर आरोग्यदायी जीवन जगण्याची तळमळ आणि इच्छा असण्याची गरज असते .
वाईट परिस्थितीत स्वतःला आणि परिवाराला दुक्खी करण्यापेक्षा , असेल त्या परिस्थितीत सर्वांचे आरोग्य / स्वास्थ्य (मानसिक आणि शारीरिक ) कसे उत्तम राहील या कडे लक्ष देणे फार गरजेचे असते . असे आरोग्याच योग्य विचार, योग्य निवड आणि परिस्थितीला सामना करण्यासाठी लागणारी उर्जा आपल्याला पुरवत असते आणि त्याच जोरावर आपण आपले जीवन सोपे करू शकतो .
गरिबीत घेतलेली तब्बेतीची काळजी नवीन स्वप्ने
पूर्ण करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न , धाडस , निर्भीडता वाढवण्यासाठी मदत करते तर श्रीमंतीत असे उत्तम आरोग्य अनेक गोष्टींचा तर तम भाव सांभाळून आनंदी जीवन उपभोगायची संधी देते. प्रत्येक दुक्खाच्या चक्रा नंतर एक सुखाचे चक्र सुरु होते या वर विश्वास ठेवला तर मला वाटत समोर येईल त्या परिस्थितीला आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळून आपण सहज सामोरे जाऊ शकतो . म्हणूनच आरोग्य हि सुखाची गुरुकिल्ली आहे आणि तीच खरी श्रीमंती आहे .
Friday, March 21, 2014
लग्न म्हणजे?

लग्न म्हणजे रेशीम गाठी ,
लग्न म्हणजे जुळती नाती ,
लग्न म्हणजे साता जन्मांची तपस्या
लग्न म्हणजे साथीने सोडवाव्या समस्या
लग्न म्हणजे तन मनाचे मिलन
लग्न म्हणजे नात्यांची गुंफण
लग्न म्हणजे धर्म-अर्थ-काम- मोक्षाप्रद नेणारा मार्ग
लग्न म्हणजे दोन घराण्यांच्या साथीने आपले जीवन करावे कृतार्थ
लग्न नाही खेळ , जुळवावा लागतो सुख दुःखाचा मेळ
खर सांगायचं तर लग्न म्हणजे
कुटुंब , समाज, जबाबदारी , बांधिलकी यांची रुचकर भेळ !!!!!
Friday, March 14, 2014
चरबी किंवा मेद (स्वरूप व उपाय )
पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया.
वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात.
आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यासाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवासारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी साखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपानामुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यांबद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पेक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशाप्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातूच्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
निबंधा देशमुख यांनी शेयर केलेल्या माहिती वरून
Saturday, March 8, 2014
हरिहर किल्ला
फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण
हरिहर किल्ला
पाय-या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला....म्हणून या आज आपणास दिसत आहेत.
पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हां थरार आपण एकदा तरी अनुभवाच.....!!!
इगतपुरी -घोटीपासून जवळच आहे हां किल्ला...!!
पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.
१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरकिल्ला व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
४) इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडा
फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण
Friday, March 7, 2014
Thursday, March 6, 2014
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
| Happy International Women's Day |
रूपेषु लक्ष्मी , क्षमायेषु धरित्री ,शत धर्म युक्ता ,कुल धर्म पत्नी
अशा प्रकारे तन , वाणी आणि मनाने जी पूर्ण पणे समर्पित आयुष्य जगते अश्या त्या स्त्रीच्या गौरवाचा आजचा दिवस .
जागतिक महिला दिन !!!!!!!
दासी सारखे काम करणारी , मंत्री किंवा प्रसंगी योग्य सल्ला देणारी सल्लागार , आई च्या प्रेमाने
जेवू घालणारी , अप्सरे प्रमाणे सुख देणारी , लक्ष्मि सारखी सुंदर , पृथ्वी इतका संयम बाळगणारी आणि क्षमाशील अशा
सहा भूमिका प्रत्येक स्त्री आपल्या कुवती प्रमाणे निभावण्याचा सतत प्रयत्न करत असते . आणि यामुळेच स्त्रीशक्तीच
महत्व टिकून आहे . बदलत्या काळा प्रमाणे आज तिला तिची जीवन शैली जरी बदलावी लागत असली ,तरी तिच्यातील
स्त्रीत्वाचे गुण परोपरीने जपण्याचा तिचा प्रयत्न किंवा लढा हा सतत सुरु असतो . नवीन युगात योग्य अयोग्याचे भान ठेवण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो आणि यात तिची तारेवरची कसरत सुरु असते .
आपण सहजच विचार केला तर आपल्या अस लक्षात येईल कि शंभर वर्षांपूर्वी भारतीय स्त्री ची दिनचर्या व आजच्या भारतीय स्त्री ची दिनचर्या आणि तिच्या जबाबदार्या ह्यात विलक्षण अंतर आहे . विश्लेषणच करायचं झालं तर
शंभर वर्षांपूर्वी स्त्रीची दिनचर्या
पहाटे उठणे ,आन्हिक आवरणे ,देवघरात दिवा लावणे ,सडा रांगोळी , देवपूजेची तयारी ,दळण , कांडण , पाणी भरणे ,जमीन , चूल सारवणे ,सोवळ्यातील स्वयंपाक (चुलीवर )(काहींना गाय गुरांसाठी चारा आणि गोठ्याची कामे करावी लागत असत तर काही ठिकाणी शेतीची कामेही केली जात ),घरातील लहान मुले ,वृद्ध यांची काळजी घेणे योग्य वेळी घरातील जेवणखाण उरकणे ,(प्रसंगी घरातील कुलधर्म कुलाचार योग्य रीतीने पार पाडणे ) इत्यादी , सायंकाळी त्या स्त्रीचा दिवस संपत असे.
आजच्या स्त्रीची दिनचर्या (सर्वसाधारण ८०% स्त्रिया आज नोकरी व्यावासायाकरता बाहेर पडत असतात हे गृहीत धरून लिहित आहे )
पहाटे उठणे , आन्हिक आवरणे , आपल्या कुटुंबाच्या डब्यांसाठी जेवण तयार करणे , मुल लहान असेल तर त्याच्याबरोबर पाळणाघरात द्यायच्या
वस्तूंची तयारी करणे किंवा मुलाला शाळेत जायला तयार करणे , स्वताची तयारी करणे आणि वेळेवर कार्यालयात हजर होण्यासाठी बाहेर पडणे . संध्याकाळी थकून घरी आल्यावर पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करणे , टिव्ही वर आवडीच्या मालिका पाहणे , मुलांचा अभ्यास घेणे .
या सर्वात जमेल तसे स्त्री वेळो वेळी येणारे सण , समारंभ योग्य रीतीने साजरे करण्याचा आणि नातेवाईकांप्रती आपली कर्तव्ये पार पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करते . काही वेळा संयुक्त कुटुंब असेल तर घरात मोठी माणसे असतात पण पुष्कळ विभक्त कुटुंबात हीच दिनचर्या पहावयास मिळते .
आता या दोन्हीची तुलना केली तर तुम्हाला काय वाटत, खर्या अर्थाने उत्तम आयुष्य कोणती स्त्री जगली?
खरतर याच उत्तर फार अवघड आहे पण त्याही पेक्षा अवघड आहेत ते प्रश्न जे बदललेल्या जीवनशैली मुळे या ८० टक्के स्त्रियांना सामोरे जावे लागत आहेत . मग ते त्यांच्या स्वास्थ्या संबंधी असतील , नात्यांसंबंधी असतील , त्यांच्या मातृत्वासंबंधी असतील किंवा अन्य .
आज जागतिक महिला दिन साजरा करताना एकाच गोष्टीची खंत वाटते कि स्त्री संबंधी असणाऱ्या समस्यांचं स्वरूप बदलत आहे , तीची आर्थिक बाजू जरी बळकट होत असली तरी मानसिक आणि शारीरिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत . अशा समस्यांवर मात करण्यासाठी तिला कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याची आवश्यकता आहे . फार कमी स्त्रियांना असा आधार मिळतो परंतु बर्याच अंशी स्त्रिया त्यापासून वंचित राहतात . खर्या अर्थाने तुमच्या घरातील स्त्री चा आदर वाटत असेल तर आज पासून तिच्या मागे खंबीर पणे उभे राहा ! तुमच्या सहकार्याने तुम्ही तिचे आयुष्य व आपले आयुष्य आनंदी ठेवू शकता .
Thursday, February 27, 2014
सुगरण
सुगरण हा शब्द उच्चारला कि दोन गोष्टींची आठवण येते ,
एक म्हणजे कलाकुसर आणि मेहनतीने आपला घर विणणारा सुगरण पक्षी आणि
दुसरी म्हणजे उत्तम आणि चविष्ट स्वयंपाक करणारी घरातली स्त्री ! मग ती कोणीही असेल
आपली आई /ताई /वाहिनी/सासूबाई किंवा तुम्ही स्वतः हि :)
खरतर सुगरण आणि स्त्री हे एकमेकाला पूरक शब्द आहेत . ती स्त्री आहे म्हणजे ती सुगरण असलीच पाहिजे असा पूर्वीच्या काळी एक अलिखित नियमच असे . परंतु आता या सुगरणींच्या यादीत आणखी एका स्त्री ची भर पडली आहे ती म्हणजे घरात स्वयंपाक करायला येणारी बाई (स्त्री ) . हल्ली घरातील स्त्री हि सुगरण असेलच किंवा असावी या बद्दल काही ठरलेली मते नाहीत . विशेषतः उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या समाजात या गोष्टीला फारसे महत्व दिले जात नाही . अशा घरांमध्ये स्वयंपाकाला येणारी स्त्री हीच सुगरणीची भूमिका निभावत असते आणि सर्व जण तिने शिजवलेल्या अन्नाच कौतुक करत रोज जेवताना दिसतात . आणि तिचं मन दुखावल गेलं तर ती यायची बंद होईल अशी भीतीही कुठेतरी मनात दडलेली असतेच .
घरातील स्त्री नोकरी/व्यवसाया निम्मित्त दिवसाचे बरेच तास बाहेर असल्यामुळे अशा सुगारिणीना भलतेच महत्व प्राप्त झाले आहे .
खर म्हणजे आज मी या विषयावर लिहिण्याच मुख्य कारण फारच वेगळं आणि चिंताजनक आहे . आज काल घरात एक किंवा दोन मुल असतात .
त्यात ते मुलगे असतील तर स्वयंपाक या विषयात त्यांच्या कडून अपेक्षा केली जात नाही आणि त्यांनी काही मदत केलीच तर त्याचे कौतुकही केले जाते . परंतु त्या मुली असतील तर आज काल एक वेगळच चित्र पाहायला मिळत . ती मुलगी आहे कधीतरी सासरी जाणार आहे आणि तिला त्या घरात काम कराव लागेलच या कल्पनेने आज कालच्या स्त्रिया आपल्या मुलींना घरात काम करू देत नाहीत किंवा त्यांच्या कडून फारशी अपेक्षा हि करत नाहीत .
हे योग्य का अयोग्य याचा निर्णय जाने त्यानेच घ्यायचा आहे परंतु या संदर्भात मला आलेला अनुभव फारच विचित्र आहे .
कार्यालयात काम करताना सतत आपण नवीन सह कर्मचार्यांच्या संपर्कात येत असतो . एकत्र काम करता करता मैत्री वाढते आणि मग एकत्र चहापान , लंच घेऊ लगतो. अशीच एक नवीन मैत्रीण काही दिवसांपूर्वी आमच्या लंच ग्रुप मध्ये सामील झाली . हास्य विनोद, नवीन पद्धतीने केलेल्या रोजच्या जेवणा बद्दलच्या चर्चा , एकमेकांच्या पाक कला कौशल्याचे कौतुक ह्या सर्व लंच घेताना घडणाऱ्या नेहमीच्याच गोष्टी ! या नवीन मैत्रिणी बरोबर सुरवातीला लंच घेताना आम्हा सर्वाना फारच चांगला अनुभव आला . ती हि आमच्याच सारखे रोजचे जेवण घरून आणत असे आणि सर्वांबरोबर शेयर करत असे परंतु काही दिवसांनी आमच्या अस लक्षात आलं कि तीने आणलेला लंच हा तिने केलेला नसून तो आदल्या रात्री तिच्या स्वयंपाकीण बाईनी केलेला असतो . ती फक्त दुसर्या दिवशी तो बरोबर आणत असे . तिने असे करण्या मागचे कारण विचारातच असे लक्षात आले कि तिला स्वयंपाकाची अजिबात सवय नाही आणि आता शिकायची फारशी आवड आणि इच्छाही नाही . काही दिवसांनी तिच्या स्वयंपाकीण बाईनी नोकरी सोडली आणि नवीन बाई मिळाल्या नाहीत . तिने लंच हॉटेल मधून मागवायला सुरवात केली . पण तिने शेयर केलेलं ते हॉटेल च अन्न रोज खाण आम्हाला मान्य नव्हत . बरेच दिवस असेच निघून गेले तरीही तिला स्वयंपाकाला बाई मिळाल्या नाही आणि तिची घरचे अन्न खाण्याची ओढ वाढत गेली . पुढे काही दिवसांनी सतत हॉटेल चे जेवण जेवून तब्बेत बिघडू लागली आणि खर्च हि वाढू लागला . आणि ती आमच्या कडून तिच्या साठी लंच आणण्याची अपेक्षा करू लागली . हि गोष्ट लक्षात येताच स्पष्ट शब्दात तिला बर्याच गोष्टी समजावाव्या लागल्या .
घरी शिजवलेलं अन्न हे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनेयोग्य आहे आणि सर्व वयोगटातील माणसांची ती मुळ गरज आहे . त्यामुळे घरातील स्त्री म्हणून तुला स्वयंपाक करता येण हि गरजेची गोष्ट आहे . स्वयंपाकीण बाई हि पर्यायी सोय आहे आणि जरूर असेल तेव्हा आणि शक्य असेल तेव्हा त्यांची मदत घेतलीच पाहिजे परंतु स्वयंपाक येतच नाही म्हणून हा पर्याय योग्य नाही . स्त्री आपल्या नोकरी / व्यवसायात कितीही व्यस्त असली तरी तिला चविष्ट स्वयंपाक करता येण हि अपरिहार्य गोष्ट आहे आणि तिच्या सवडी आणि आवडी प्रमाणे तिने त्यात सुधारणा करणे हे तिचे कर्तव्य आहे. स्त्री पुढच्या पिढीला जन्म देत असते, संस्कार करत असते आणि तिने शिजवलेल्या अन्नातून तिच्या मुलांवर होणारे संस्कार इतर कोणत्याही अन्नातून होणार नाहीत . आपण स्वतःच स्वयंपाक करू शकलो नाही तर आपल्या मुलांना कौतुकाने त्यांच्या आवडीचे पदार्थ करून घालणारी आई तुम्ही कुठून आणणार?
हे सर्व वाचणार्या प्रत्येक आई ला माझी कळकळीची विनंती आहे , आपल्या मुलीला स्वयंपाक जरूर शिकावा . तिला स्वयंपूर्ण बनवा . तुमच्या चुकीच्या लाडाने तुम्ही केवळ तिच्या भावी घराचेच नव्हे तर नकळत पूर्ण समाजाचे नुकसान करत आहात .
| Sugaran |

Tuesday, January 14, 2014
तिळगुळ घ्या आणि गोड बोला
| Happy Makar Sankrant! |
नात्यातील ओढ टिकवून ठेवतो तो तिळगुळ ….
आणि सर्वाना एकत्र आणतो तो सण मकर संक्रांत
जेव्हा खर्या अर्थाने आपण अनुभवतो तिळाचा स्नेह आणि गुळाची गोडी
मकर संक्रांतिच्या दिवसा पासून रथसप्तमी पर्यंत हा संक्रांत सण साजरा करण्याची आपल्या कडे
प्रथा आहे. उत्साहाने सुवासिनी घरोघरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत असतात . रोजच्या
व्यस्त जीवनातून स्त्रियांना एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत , तिळगुळाचा आनंद सहज
लुटता यावा या साठी अशी परंपरा असावी . या हळदी कुंकवाच वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी
सुवासिनी हळदी कुंकू आणि तिळगुळा सोबतच आपल्याला जमेल आणि रुचेल अशी कोणतीही
वस्तू लुटू शकते ( वाटू शकते). कदाचित एक स्त्रीच इतर स्त्रियांच्या भावना आणि गरजा समजू
शकत असेल असा दृढ विश्वास आपल्या पूर्वजांना असल्या मुळे हे प्रचलित झाले असावे असे वाटते .
या सर्व गोष्टींचा मेळ माझ्या मते एकाच उक्तीशी जुळून येतो ती म्हणजे "वसुधैव कुटुम्बकम"!
एक स्त्री म्हणून इतर स्त्रियांचा आदर करणे , एकमेकांच्या गरजा समजून घेणे आणि प्रेमाने
एकत्र येउन एकमेकांना मानसिक आणि आत्मिक आनंद देणे हा या हळदी कुंकू समारंभाचा
मुख्य उद्देश आहे .
अशाच भावनेतून आणि संकल्प करून या वर्षीचा संक्रांत सण साजरा करताना मला अविस्मरणीय आनंदाचा अनुभव आला . काल १४ जानेवारी २०१४ रोजी भिनारी च्या आदिवासी पाड्यात जाऊन केलेल्या
हळदी कुंकू समारंभातून अशा प्रेमाचा सहज आनंद घेता आला . आमचे फेसबुक मित्र श्री . श्रीरंग
आठल्ये आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या ताई , या दांपत्या मुळे आदिवासी पाड्यात त्यांच्या घरी
जाऊन त्यांच्या सोबत हा सण साजरा करण्याचा योग आला . तिथे जमलेल्या सर्व भगिनींची ओटी भरून , बच्चे कंपनीला खाऊ वाटून आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही घरी परतलो . त्या भगिनींच्या चेहऱ्या वरील आनंद एक वेगळे समाधान देऊन गेला
अशा गोष्टी करताना जस मित्र मैत्रिणींच सहकार्य लागत तसच घरातून मिळणारा पाठींबा फार महत्वाचा
असतो . मुंबई पासून भिनारी ला एकटीने जाणे शक्य नव्हते पण माझे पती गणेश बडे यांच्या कडून सतत
मिळणारे प्रोत्साहन माझा भाऊ (श्री जयंत गोंधळेकर) आणि वाहिनी (सौ मानसी ) यांचे प्रेम या मुळे हे
तडीस नेणे शक्य झाले .
| Wahini :Manasi, Sandhya tai aani Shrirang Athalye, Bhau: Jayant Gondhalekar |
आपल्या अवती भवति असलेल्या समाजाचे ऋण कधीही न फिटणारे असते . पण आपल्या मनात या
समाजासाठी काही करण्याची भावना जर खरी असेल तर सहकार्य करण्यासाठी बरेच हात पुढे येतात आणि
आपण एकटे पडत नाही याची जाणीव खर्या अर्थाने मला या संक्रांत सणाने करून दिली .
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
Saturday, December 7, 2013
नारळ-आंबा वडी
साहित्य:
अर्धी वाटी आटवलेला आंब्याचा रस ,
खोवलेला नारळ : एक ,
चार वाट्या साखर ,
एक वाटी दुध
एक चमचा वेलची पूड
कृती :
प्रथम कढई गरम करावी . खोवलेला नारळ , आटवलेला आंब्याचा रस आणि साखर
कढई मध्ये एकत्र घालावे . एक वाटी दुध घालावे . सर्व मिश्रण ढवळत राहावे .
साधारण पंधरा मिनिटांनी कढई च्या कडेला साखर साखत असल्या सारखे दिसू
लागले आणि मिश्रण ढवळताना चमचा अवघड वाटू लागला कि एका ताटाला
तूप लावून घ्यावे आणि त्या मिश्रणाचा गोळा ताटावर ओतावा . एका जाडसर प्लास्टीक
च्या पिशवीला तूप लावून , तूप लावलेला भाग त्या गोळ्यावर ठेवावा आणि लाटण्याने
गोल पसरून घ्यावा . पसरलेले मिश्रण गरम असतानाच वड्या कापाव्या
लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी किंवा नैवेद्याला अशा वड्या नक्की करून पाहता येतील
Subscribe to:
Posts (Atom)