Saturday, December 7, 2013

नारळ-आंबा वडी




साहित्य:
अर्धी वाटी आटवलेला आंब्याचा रस ,
खोवलेला नारळ : एक  ,
चार वाट्या साखर ,
एक वाटी दुध
एक चमचा वेलची पूड

कृती :
प्रथम कढई गरम करावी . खोवलेला नारळ , आटवलेला आंब्याचा रस आणि साखर
 कढई मध्ये एकत्र घालावे .  एक वाटी दुध घालावे . सर्व मिश्रण ढवळत राहावे .
साधारण पंधरा मिनिटांनी कढई च्या कडेला साखर साखत असल्या सारखे दिसू
लागले आणि मिश्रण ढवळताना चमचा अवघड वाटू लागला कि एका ताटाला
तूप लावून घ्यावे आणि त्या मिश्रणाचा गोळा ताटावर ओतावा . एका जाडसर  प्लास्टीक
च्या पिशवीला तूप लावून , तूप लावलेला भाग त्या गोळ्यावर ठेवावा आणि लाटण्याने
गोल पसरून घ्यावा . पसरलेले मिश्रण गरम असतानाच वड्या  कापाव्या

लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी किंवा नैवेद्याला अशा वड्या नक्की करून पाहता येतील

Monday, November 18, 2013

शनि महात्म्य


मला आवडलेले मराठीतील 80
ओव्यांचे शनि महात्म्य इथे देत आहे.  वाचायला सोपे
आणि लवकर पाठ होईल असे स्तोस्त्र आहे. ज्यांना मोठे शनि महात्म्य वाचणे
शक्य नसेल त्यांनी जरूर वाचा !



श्री गणेशाय नमः

उज्जयनी या नगरमध्ये जो विक्रम राजा
न्याय नीतीने राज्य करी तो आनंदी हि प्रजा

अशाच एके समयी त्याने पंडित पाचारुनी
ग्रहश्रेष्ठ तो कोण असे? मज सांगावे ज्ञानी

रवि ग्रहाची पूजा करिता विघ्ने ती पळती
आधिव्याधि नि दरिद्र दु:खे त्या स्मरता शमती

सोमाची ती ताकद भारी पोषी वनराजी
शंभूच्या तो भाळी विलसे नच कोणा गांजी

मंगळ ग्रह तो क्रूर परंतु पुजकास मानी
दु :खे निरसुनि  वाचवी दीना द्रव्या देउनी

बुध ग्रहाचा प्रताप मोठा सर्व ग्रह माजी
विघ्ने पळती मुळापासुनी जो मोदे पूजी

गुरु ग्रहाची फार थोरवी प्रिय पूजकासी
शुक्राचे ते पूजन करिता भाव दु:खे नाशी


पंडितांनी सर्व ग्रहांची तारीफ ती कथुनी
शनिदेवाचे वर्णन करता रायाचे कानी

शब्दची पडले शनि देवाची दृष्टी पितयावर
पडता भरले क्षणात त्याच्या कुष्ठची अंगावर

सारथी होता तोही झाला क्षणात पांगुळा
अश्वाचे ते डोळे जाऊन झाला घोटाळा

वाक्य ऐकुनी नृपतीने त्या टाळी वाजवली
शनि देवाची हसून त्याने टवाळीच केली

त्याच वेळी विमानातुनी जाता शनिराजा
खाली उतरले पाहता विनये कर जोडी राजा

हात जोडूनी शनिदेवाला वदला तो नृपती
तुम्हा निंदिले क्षमस्व न धरा राग मजवरती

बोल ऐकुनी शानिश्वराना राग बहु आला
बारावा मी आलो आता कन्या राशीला

चमत्कार हा तुला दाखवीन क्षणात एका मी
रूप पालटूनी शनिदेव आले कथा असे नामी

वारू विकाया आणले त्यांनी उज्जयनी नगरा
अबलख वारुवरी बैसला विक्रम राव खरा

टाच मारीता  वारू गेला जैसा कि वारा
दाट वनी  त्या नृपतीने धरला कि आसरा

वारू गुप्त तो होता नृपती निद्रिस्तचि झाला
प्रभात होता तामालीन्द्पूर या नगरा गेला

तामालीन्द्पूर नगरामध्ये  वैश्याची तनया
मोहित झाली विवाह करण्या पाहुनी तो राया 

हेतू आपुला कथुनी मुलीने बाबांच्या कानी 
द्यावे धाडुनी अतिथीला त्या इच्छा-वर म्हणुनी 

आज्ञे परी तो अतिथी गेला पुत्रीच्या महाली 
मध्यरात्रीला आरती घेउनि आली ती बाळी 

शनिदेवाच्या मायेने तो निद्रीस्ताची झाला 
मान वळवूनी पाहीना तो वैश्य कन्यकेला 

भिंतीवरच्या चित्रामधल्या निर्जीव हंसाने 
खुंटीवरचा मौक्तिक हारची गिळला प्रेमाने 

राती सौख्य ते नसे लाभले वैश्य कन्यकेला 
चोरी करुनी अतिथिने त्या हर पहा नेला 

वैश्याने मग अतिथीला त्या नेले बांधुनिया 
राया करवी हात पाय ते दिधले तोडूनिया 

कर-चरणाविन दीन कष्टला राया तो भारी 
उज्जायनीची तेलीण चाले तमालिंद नगरी 

तिने पहिले नीजनृपतीला दया बहु आली 
तेल-घाणीवर नेते यांना विनंती हळू केली 

सदय होऊनी दिली मान्यता चंद्रसेनानी 
तेलीणिची विनयशील ती विनंती ऐकुनी 

घाण्यावरती नृपतीने तो दीप राग म्हणता 
दीप उजळले नगरामध्ये ते हा हा म्हणता 

राग ऐकुनी पद्मावती ती प्रसन्न मनी झाली 
विवाह करण्या विक्रमासवे ती उत्सुक झाली 

इतुक्या अवसरी शनिदेव ते आले त्या स्थानी 
पाद- हस्त  अन दिव्य तेज ते दिधले तोषोनी 

शनिदेव ते प्रसन्न झाले राव विक्रमाला 
इच्छावर तो मागून घेण्या सांगितले त्याला 

भूपति बोले गांजू  नको तू मनुष्यप्राण्याला 
हीच विनंती मनापासुनी केली देवाला 

वाक्य ऐकुनी राजाचे श्री शनिदेव वादती 
परपीडेच्या   कष्टाची तुज जाण असे पुरती 

विक्रमासी हास्यविनोदे शनिदेव वदले 
दानव देवा छळले भारी, तुज थोडे छळले 

देव दैत्य ते कसे गांजिले श्रवण करी राया 
प्रातः काळी  वाकून केले नमनचि गुरुराया 

हात जोडूनी विनंती केली श्रीगुरुनाथाला 
साडेसात वर्षे येतो तुमच्या राशीला 

शानिदेवाचे बोल ऐकुनी गुरुदेव म्हणती 
साडेसात वर्षे येत होईल दीन स्थिती 

सव्वा प्रहरचि यावे म्हणुनी सांगितले गुरुनी 
बोल गुरुचे मान्यचि केले श्री शानिदेवानी 

वाक्य ऐकुनी गुरुदेवांनी विचार मनी केला 
स्नान संध्यादि कर्मामध्ये दवडीन हि वेळा 

स्नान करुनी गंध लावूनी दिसता गुरुराजे 
फकीर वेषे येउनि शनिने दिधली खरबुजे 

तीच खरबुजे पंचामध्ये बांधुनी श्रीगुरूनी 
रस्ता धरला नगराचा झणी मोठ्या हर्षानी 

त्या नगरीचे राजपुत्र अन प्रधानपुत्र वनी 
शिकारीस ते गेले होते दो घोडयावरुनी 

प्रहर झाला तरी नाच आले म्हणुनी रायानी 
धुंडायासी सैन्य धाडिले बघ रानोरानी 

सैन्य निघाले तोच पहिला विप्र एक त्यांनी 
झोळी होती हाती त्याच्या घेतली काढोनी 

झोळी बघता त्यात निघाले शिरकमळे दोन्ही 
प्रधान राजपुत्राची ती घेतली काढोनी 

शिरकमळे ती विप्रासहितचि राजाच्या महाली 
विप्र कृती ती यथासांग मग त्याला ऐकवली 

राजाने मग आज्ञा केली द्यावे सुळी याला 
म्हणुनी सेवके लोखंडाचा सूळ उभा केला 

विप्राला त्या घेउनि जाता नगराबाहेरी 
विनंती केली देऊ नका सुळी सव्वा प्रहर तरी 

विप्राला त्या घेउनि जाता विप्र काय बोले 
अपराधी मी नसे मुळी मज शनिने गांजीयले 

एक प्रहर मज वाट बघुनी द्यावे झणि फाशी 
म्हणुनी लागला विप्र सविनये सेवक-चरणाशी 

विप्रवचन ते श्रवण करुनी राज्यासेवकांनी 
मान्यची केले बोल तयाचे मोठ्या प्रेमानी 

हा हा म्हणता सव्वा प्रहरचि निघोनिया जाता 
राजपुत्र अन प्रधानपुत्रही आले अवचीता 

त्यांना पाहुनी रायाने मग विप्र पाचारुनी 
द्रव्य देऊनी सोडविले त्या वंदनही करुनी 

शनिदेवाच्या मायेने मी कष्ट दिले फार 
म्हणुनि लोळला तोच नृपती गुरुचे पायावर 

झोळी काढुनी पाहता ती खर्बुजेच होती 
शिरकमळांची लुप्त जाहली क्षणात आकृती 

शानिदेवानी नमन करुनी श्री गुरुदेवाना 
प्रश्नचि केला कशा भोगिल्या दारूण त्या यातना 

गुरु बोलले शनिदेवा तू ग्रहात श्रेष्ठ खरा 
सव्वा प्रहारामध्ये  माझा केला मातेरा 

सत्वर जाऊनी  शनिदेव ते शंभू चरणासी 
जाऊन वदले येतो स्वामी तुमच्या मी राशि 

बोल ऐकुनी शंभूराजा लपला कैलासी 
काय आपुले केले वदले श्रीशानिदेवासी 

धाक त्रिभुवनी असता तुमचा कैलासी लपला 
प्रताप माझा पाहुनी तुम्ही भयभितचि झाला 

आला जेव्हा शनिग्रह तो दशरथ-पुत्राला 
चौदा वर्षे दारूण त्याने वनवास भोगियला 

तसाच येता श्रीशानिराजा सीतामाईला 
लंकेशाने कपात करुनी नेले लंकेला 

बारावा तो आला जेव्हा लंकाधीशाला 
सरळचि  झाले नवग्रहचि तो  मुकला प्राणाला 

बारावा तो आला जेव्हा हरिश्चंद्र राया 
डोंबा घरी तो कुमार विकला तशीच ती जाया 

कपटाने ती पहा भोगिली गौतमाची जाया 
पापाने इंद्राची झाली रूपहीन काया 

नळराजाची  प्रिय पत्नी जी दमयंती मानी 
विरह करविला प्रेमाचा त्या ताटातूट करुनी 

गुरुपत्नीसी कपटे धरता कलंक चंद्राला 
वसिष्ठासी तो येता  गेले सुत-शत स्वर्गाला 

पंडूसुतांना  पीडा होता वनवासी झाले 
श्रीकृष्णाला स्यमंतकाचे लांछनही लागले 

विक्रमाला पाहुनी वदला वैश्य दीन वाणी 
अज्ञानाने केली तुमची छळणूक रायानी 

एक देश तो राये दिधला मोदे वैश्याला 
वैश्याने हि कन्या अर्पुनी दुवाच जोडीयला 

चित्रीच्या त्या हंसाने जो हर पहा गिळला 
तसाच त्याने पहा पुनरपि मोदे उगळीला 

हार  उगळीता विस्मय वाटे साऱ्या जनतेला 
हात जोडूनी वंदन करिती श्री शनि देवाला 

प्रेमाने त्या विक्रम न्रुपतिसि चंद्रसेन वदला 
आपण कुठले ? वंश कोणता ? सांगा हो मजला 

प्रश्न ऐकता विक्रम बोले काय चंद्रसेना 
विक्रम माझे नाव असे मी उज्जैनीचा राजा 

चंद्रासेनाने आपली कन्या मोदे देवोनी 
त्या राजसी सख्य जोडले भाक्तीप्रेमानी 

राजाची त्या शनि-प्रसादे साडेसाती गेली 
राव पाहुनी उज्जैनीची प्रजा सुखी झाली 

श्री शनि-प्रभूचे वर्णन केले शनिश्वरा नमुनी 
शब्दही सोपे भाषा सुंदर मांडीयली कविनी 

नित्य प्रभाती व शनिवारी करी पठण त्याला 
देव शनि तो देईल द्रव्या कीर्ती वैभवाला 

वर्षे साडेसात शनीची पीडा ज्या होते 
प्रसन्नचि मने वाचन करिता दैन्य लया जाते 

सप्रेमे हि काव्य मालिका पुष्पकांतांनी 
नम्रत्वाने अर्पण केली मातेच्या चरणी 









Monday, October 28, 2013

कल्ला

Kalla 


बालपण, मौज,मस्ती,खोड्या, खेळ, भांडणं हे सर्व शब्द एकमेकाशी अगदी निगडीत आहेत. या सर्वांशी
आणखी एका शब्दाचा फार जवळचा संबंध आहे तो म्हणजे निरागस किंवा निष्पाप वृत्ती . कालानुरूप
या बालपणाशी अनेक नवे शब्द जोडले गेले त्यातलाच एक म्हणजे कल्ला ! कालच अशा कल्ल्याचा
एक वेगळा अनुभव मिळाला .

संध्याकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसातून  घरी आले आणि चहा घेत बसले होते . बाहेर अचानक जोरजोरात
किंचाळण्याचा आणि वेगात काहीतरी घडत असल्या सारखा आवाज आला . मी वेध घेऊन आवाजाच्या दिशेने
पाहायला गेले तो पर्यंत रस्ता आधी सारखाच  शांत दिसत होता. मग आवाज आला कुठून?
मी पुन्हा घरात येउन माझा चहा कार्यक्रम सुरु केला . काही वेळाने परत तसाच गलका ऐकू आला . पुन्हा
जाऊन पाहते तर काही मुल व मुली सायकल चालवत जोर-जोरात किंचाळत जाताना दिसली . त्यांच्या
आवाजाने पूर्ण गल्ली हादरून निघत होती पण त्यांना असे करण्यामागचे कारण विचारण्या करिता एकही
मनुष्य पुढे आला नाही .  मी पुन्हा त्यांच्या येण्याची वाट पाहत तिथेच उभी राहिले . थोड्या वेळाने त्या बाल
टोळीचे पुन्हा त्याच थाटात आगमन झाले . मी सरळ रस्त्याच्या मध्ये जाऊन त्यांची सायकल अडवली आणि
त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला .
आधी थोड दरडावूनच त्यांना असं करण्याच कारण विचारलं . मी अडवलेल्या सायाकालीन्व्यातिरिक्त आणखी
पंधरा सायकली मला घाबरून तिथून निघून गेल्या .  कारण विचारल्यावर नेहमी प्रमाणे मुल माफी मागू लागली . थोड्या वेळाने मी त्यांना बाकीच्या सर्व सवंगड्याना  बरोबर घेऊन यायला सांगितले . मला वाटल होत कि मी ओरडेन म्हणून ती घाबरतील आणि येणार नाहीत . पण थोड्याच वेळात ती जवळ जवळ वीस सायकल स्वारांची  टीम मला भेटायला आणि माझी माफी मागायला आली . हे मला फारच अनपेक्षित होते . "तुम्ही सायकल चालवू नका असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतु ज्या पद्धतीत किंचाळत तुम्ही शांती भंग करीत आहात हे योग्य नाही"हे माझे सांगणे त्यांना मनापासून पटले होते. खरतर आपण यात काही चूक करीत आहोत हे त्यांना कळलेहि नव्हते . आस पास म्हातारी, आजारी माणास, लहान बाळ असतात तेव्हा इतरांना त्रास होईल असा गलका करू नका असे सांगितल्यावर त्यांना खरच वाईट वाटले आणि तसे न करण्याचे त्यांनी कबुल केले .
आपण नेहमी म्हणतो कि आजची पिढी Mature आहे त्यांना सगळ काही फार लवकर कळत … हे काही अंशी सत्यही आहे परंतु आज काल आपणही त्यांना गृहित धरून त्यांच्यातील निरागसतेचा चुकीचा अर्थ तर लावत नाही न याचा शोध घेतला पाहिजे . काल  त्या मुलांना ओरडताना सुरवातीला हि मुले सगळ काही काळत असून , इतरांना मुद्दामून त्रास व्हावा म्हणूनच अस वागत आहेत हे मी कुठेतरी गृहीत धरलं होतं परंतु त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं कि ती त्यांची निरागसता होती . किंबहुना मला असं जाणवलं  कि योग्याठीकाणी , योग्यवेळी मोठ्यांनी आम्हाला अयोग्य गोष्टी करताना रोखाव अस त्यानाही
वाटत होतं . यातून एकच गोष्ट जाणवते मुलाचं बालपण योग्यरीतीने जपायचं असेल तर त्यांच्याशी पूर्वग्रह दुषित न होता संवाद साधा .
आधुनिक जगात वावरणाऱ्या या मुलांना टेक्नोलॉजी लवकर कळते परंतु भावना कळायला उशीर होतोय .  हा उशीर टाळायचा असेल तर परिवाराने सातत्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे उत्तम मार्गदर्शक होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे .
आणि  पालकांनी स्वतःला या गोष्टींसाठी सर्वतोपरी तयार करणे आवश्यकच  आहे .

Thursday, October 24, 2013

आली दिवाळी


Happy Diwali 

जमल तर दिवाळी अशी साजरी करून पहा

* विकतची बर्फी / मिठाई आणण्या पेक्षा घरात काजू / नारळ / गाजर /दुधीच्या वड्या करून पहा .
  नकली मावा आणि चांदीच्या वर्खा पासून स्वतःला आणि परिवाराला वाचवा .

* जोरदार आवाजाचे फटाके वाजवण्या पेक्षा फटाक्यांवर होणारा खर्च अनाथ आश्रमात फराळ वाटण्या
करिता करा .

*  रोषणाई करिता विजेचा वापर शक्यतो टाळा .

* मेसेज पाठवण्या पेक्षा किंवा फोन वर दिवाळी शुभेच्छा देण्या पेक्षा आपल्या जवळच्या माणसाना
प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमचा वेळ देऊन सणाचा आनंद द्विगुणीत करा

* दिवाळी आणि रांगोळी तसेच मातीचा किल्ला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत . घरातील छोट्यांना
याचा परिचय करून द्या .

* दिवाळीचे सगळे दिवस,  त्या त्या दिवसाच महत्व अबाधित राखून आणि आपापसातले वाद / भांडण तंटे
विसरून मनापासून साजरे करा

* सणाला आपल्याला कुणी काय दिलं याच मोजमाप करत बसू नका . परंतु तुम्हाला तुमच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व करा .

Sunday, October 20, 2013

डोहाळे जेवण गीत

मुलाला जन्म देण म्हणजे बाई चा पुनर्जन्म अशी फार पूर्वीची म्हण आहे. गर्भाची चाहूल लागल्या पासून
 स्त्री ला येणारे वेगवेगळे अनुभव आणि दिवस भरत आल्यावर तिचे बाळंतपण उत्तम रीतीने
पार पडावे  या करिता सासर आणि माहेरच्यांनी तिला दिलेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आधार
या सर्वाचा उत्तम पिढी निर्माण होण्यात फार मोठा वाटा असतो .  असाच एक प्रघात म्हणजे डोहाळी जेवण
गर्भवतीला उत्तमोत्तम आवडतील असे पदार्थ खाऊ घालणे , तिच्या आसपास वातावरण प्रसन्न ठेवणे , तिच्या
हौशी पुरवणे , तिला सर्वतोपरी आनंदी ठेवणे हा या मागचा उद्देश आहे .  अशा डोहाळी जेवणाच्या दिवशी
गायले जाणारे गीत म्हणजे डोहाळे गीत .  आज काल या प्रथा आणि त्यासोबत येणारी गीतं फार कमी लोकांना माहिती असतात किंवा त्या पार पडण्याचा उत्साह असला तरी पद्धती माहित नसतात . तुमच्या साठी खास
एका डोहाळे गीताचा विडीओ इथे पोस्ट करत आहे । गीताचा नक्की आनंद घ्या आणि प्रतिक्रिया नक्की  लिहा


Monday, September 30, 2013

The Lunchbox



द लंच बॉक्स सिनेमा कालच पहिला. अतिशय दर्जेदार , कुठेही कंटाळा येऊ न देणारा  म्हटल
तर अति सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेला चित्रपट! 
ज्याचं आयुष्य मिळेल त्यात समाधानी राहणे आणि रोज जे बाराच्या ठोक्याला समोर 
येईल ते निमूट पणे  स्वीकारणे  असे असते त्यांच्या जीवनाची कहाणी . 
नवीन जीवन पद्धती ,महागाई या मुळे घरातील दुरावाणारी नाती , ठराविक चौकटी बाहेर 
विचार करायला लावणारी मनस्थिती आणि त्यातून आयुष्यात घडणारे बदल . 

सिनेमा पाहताना खरच एक विचार नक्की पक्का झाला कि घरातील माणसांमधील एकजूट , प्रेम, 
एकमेकांविषयीची मनापासून असलेली तळमळ , आपल्या जवळच्या माणसाला मिळालेल्या 
यशाने होणारा आनंद, छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीतून जवळच्या माणसांकडून मिळणारी 
कौतुकाची पोचपावती यांची उणीव निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींपासून प्रत्येक जण मग 
तो गरीब असो किंवा  श्रीमंत वंचित झाला आहे . किंबहुना ज्यांना या गोष्टी मिळतात त्यांचा त्या 
वरचा विश्वासही कमी झाला आहे. कुणी फक्त आपल्या स्वार्था करिता किंवा माझ्या कडून काही 
मिळावे या करिता माझ्या भावनांचा वापर तर करीत नाही न अशी भीती क्षणोक्षणी प्रत्येकाच्या 
मनात घर करून राहिली आहे . 

या करिता एकच उपाय आहे , घरातील माणसांशी सतत सवांद साधण्याचा प्रयत्न करा . त्यांची लहान 
मोठी दुखः , त्यांचे विचार , त्यांची मनस्थिती यावर लक्ष ठेवा आणि सकारात्मक विचार मांडण्याचा 
प्रयत्न करा . एकमेकाची काळजी घ्या .कठीण परिस्थितीत एकमेकाला दोष न देता शक्य असेल तो सामोपचाराचा मार्ग स्वीकारून , जवळच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या आणि मदतही घ्या .  आपली माणसे आपल्या महात्वाकांशा पायी दुरावली जाणार नाहीत याची काळजी घ्या . या जगात बराच काही मिळवण्या सारखं आणि शिकण्यासारख नक्कीच आहे पण सगळ काही मिळाल्यानंतर , आपल्या बरोबर 
कुणीच नाही याची जाणीव एका क्षणांत मिळवलेल्या सर्व गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेईल. 
दुखः आणि सुख दोन्हीही गोष्टी वाटून घेण्यासाठी माणसांची गरज असते आणि अशी माणसे आपल्या 
आसपासच असतात फक्त त्या संबंधातील ओलावा टिकवून ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे आपल्यावर 
अवलंबून असते . पहा पटत का .............

Friday, September 20, 2013

केशर : शुद्ध केशर कसं ओळखाल ?


Saffron

केशर हे जगातील महाग मसाल्यानपैकी एक गणलं  जात  . सर्वसाधारणपणे  पदार्थाची
लज्जत वाढवण्यासाठी आपण केशराचा वापर करतो परंतु आरोग्याच्या दृष्टीनेही
केशर अतिशय फायदेशीर आहे .
 पचनशक्ती वाढवणे ,रक्त शुद्ध करणे ,त्वचाविकार नष्ट करणे तसेच निद्रानाश, कफ अशा
अनेक प्रकारच्या तक्रारी दूर करण्यासाठी केशराचा उपयोग होतो .
घरात गोड पदार्थ करताना केशराचा वापर केला नाही तर पदार्थ पूर्ण होत नाही .
परंतु अस उपयुक्त केशर खरच शुद्ध आहे कि नाही हे कस ओळखाल ?

आपण केशराच फुल पाहिलं तर त्यात आपल्याला दोन प्रकारचे पराग दिसतात .
काही लाल असतात तर काही पिवळे . शुध्द केशर म्हणजे त्या फुलातील लाल पराग
हे लाल पराग चवीला कडवट असतात आणि तोंडात टाकले तर जिभेचा रंग पिवळा होतो
बरेच वेळा केशरात आपल्याला भेसळ केलेली आढळते आणि असे केशर टिकत तर नाहीच
परंतु कालांतराने काळे पडते . खरतर  शुद्ध केसर वर्षानुवर्ष टिकते आणि त्याचा रंगही टिकून
राहतो .  तुम्हाला खर्या केसराची ओळख पटावी म्हणून पुढील विडीओ नक्की पहा .
 आणि तुमचा केशर खरेदीचा अनुभव नक्की कळवा .

शुध्द केशर , वेलची , अक्रोड , जर्दाळू , उत्तम दर्जाचे बदाम हवे   असल्यास कृपया kshamaganesh@gmail.com वर संपर्क करा .



Wednesday, September 18, 2013

प्रवासी मोबाईल चार्जर

Smart Charger

प्रवास हा माझा आवडता छंद आहे आणि तुमचाही असेलच यात शंका नाही . प्रवास 
मग तो काही तासांचा असुदे किंवा काही दिवसांचा / जवळचा असुदे किंवा लांबचा पण 
अशा प्रवासात  काही ठराविक वस्तू आपल्याला नेहमीच जवळ ठेवाव्या लागतात
त्यातलाच एक म्हणजे आपला मोबाईल आणि त्याचा चार्जर .  मोबाईल हि आज 
काल  तहान भुके इतकीच गरजेची वस्तू आहे परंतु ती वस्तू फक्त जवळ असून भागत 
नाही तर अशा मोबाईलची Battery  कायम पूर्ण चार्ज असणे गरजेचे असते .  चार्जर जवळ 
असला तरी मोबाईल आपण एक तर आपल्या कार  मध्ये चार्ज करू शकतो किंवा 
हॉटेल मधल्या रूम मधे . पण विचार करा प्रवास करताना आपण कोणत्याही कारणाने 
अशा ठिकाणी अडकलो जिथे स्वताचे वाहन नाही आणि लवकर पोचणे शक्य नाही आणि 
तशातच मोबाईल पूर्णपणे डिसचार्ज झाला . 
याच विचारातून या  मोबाईल चार्जर चा  जन्म झाला असावा असं वाटल .  मी हा चार्जर 
जेव्हा पहिल्यांदा  पहिला तेव्हा माझा विश्वासच बसेना पण आता तो वापरायला लागल्या 
पासून त्याचे अनेक फायदे माझ्या लक्षात आले आहेत 

* हा चार्जर मी माझ्या पर्स मध्ये कॅरी करू शकते . आणि पर्स मधेच मोबाईल चार्जिंग ला लावू शकते 

* मोबाईल चार्ज होताना जर कॉल आलाच तर चार्जर सहज वेगळा करून बोलू शकते व परत 
लगेच चार्जिंग ला लावू शकते 

* हा चार्जर आणि चार्जिंग ला लावलेला फोन दोन्ही सहज हातात घेऊन मी कुठेही फिरू शकते 

* कोणत्याहि प्रवासात मला कोणत्याही परीस्थितीत या मुळे फोन चार्जिंग ची काळजी वाटेनाशी झाली आहे 

मी खरच या चार्जर च्या खरेदी मुळे फारच खुश आहे । तुम्ही हि वापरता का असा चार्जर?



Saturday, September 14, 2013

अनंत चतुर्दशी

Anant Chaturdashi Visarjan

गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस! बाप्पांना पुढच्यावर्षी लवकर या असं सांगून साश्रू नयनांनी निरोप 
देण्याचा दिवस !  बाप्पाच्या आगमनाचा आनंद हा स्त्रियांच्या माघार पणाला जाण्याच्या आनंद पेक्षाहि 
कितीतरी पट जास्त असतो  आणि विसर्जनाच्या  दिवशी होणारी आपल्या मनाची अवस्था सासरी निघालेल्या मुलीच्या आई सारखीच असते .  उत्सवाचे सगळे दिवस सर्व जण  एकाच भावनेने प्रेरित झालेले असतात. खरच असे उत्सव एक नवी शक्ती आणि नवी उर्जा निर्माण करतात . बऱ्याच  वेळा असे उत्सवच आपापसातले मतभेत / कटुता नष्ट होण्याचे एक निम्मित ठरतात . सर्व समावेशक असा हा उत्सव आपल्याला एक नवीन शिकवण , नवी स्फूर्ती , नव्या जाणीवा  देऊन जातो . या उत्सवाच खर वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती 
ठराविक पद्धतीचीच असली किंवा सजावट दरवर्षी प्रमाणेच असली तरी त्याच्या दर्शनाची आस 
तसूभरही कमी होत नाही  चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत चे वातावरण बाप्पामय झालेले असते . 
आबालवृद्ध त्या विघ्नहर्त्याच्या सेवेत रंगून गेलेले असतात . आपले पद , प्रतिष्ठा सगळ काही त्याच्या 
पायाशी समर्पित करून त्याचे आशीर्वाद घेण्या करिता सर्व लहान थोर नतमस्तक होतात . 
असा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या सर्वांचा निरोप घेईल 
आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याच आमंत्रण स्वीकारून आपल्या गावी निघून जाईल . 
त्याला निरोप देताना मी इतकच  मागण मागेन कि सर्वाना उत्तम बुद्धी दे , समाजातील विकृत 
मनोवृत्तींचा नायनाट कर आणि सर्वजण सुखी, समाधानी आणि आनंदी राहतील याची काळजी घेणारी 
सत्ता या भारत देशावर राज्य करू दे !

Saturday, September 7, 2013

गणपती बाप्पा मोरया!


सौजन्य अनिल पितळे 

*.परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.*

*."दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.*

*."उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला".*

*.मी म्हटले"सोडून दे, आराम करू दे त्याला".*

*."तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?.*

*.मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".*

*."मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक.*

*.तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.*

*."इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.*

*.भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".*

*."काय करू आता माझ्याने manage होत नाही.*

*.पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत".*

*."immigration च्या requests ने system झालीये hang.*

*.तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग".*

*."चार-आठ आणे देऊन काय काय मागतात.*

*.माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात".*

*."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.*

*.management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".*

*."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?.*

*.Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".*

*."असं कर बाप्पा एक Call Center टाक.*

*.तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक".*

*."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.*

*.परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको".*

*.माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाल.ा*

*."एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला".*

*."CEO ची position, Townhouse ची ownership.*

*.immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".*

*.मी हसलो उगाच,"म्हटलं खरंच देशील का सांग.?".*

*.अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग.?.*

*."पारिजातकाच्य ा सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं.*

*.सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं".*

*."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.*

*.प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव".*

*."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?.*

*.नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".*

*."इंग्रजाळलेल् या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं.*

*.आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं.?".*

*."कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर.*

*.भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार".*

*."यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.*

*.देशील का रे देवा, यातलं एक तरी दान.?".*

*."तथास्तु"म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा,"सुखी रहा"म्हणाला. . . . .

Saturday, July 27, 2013

नात तुझ नि माझं

Friendship
 नात तुझ नि माझं ,अतिशय जिव्हाळ्याच 
दूर असूनही मनानी जवळ राहायचं 
कळत नकळत एकमेकांसाठी झुरायचं 
तरीही प्रत्येक यशात आणि अपयशात 
एकमेकाला सावरायचं ,
मनातल्या जपलेल्या क्षणांना ओठावर 
येऊ नाही द्यायचं 
फक्त त्यांना मनोमन आठवून 
आनंदाने बहरून जायचं 
कोणतीही अपेक्षा, कोणतीही आशा न 
ठेवता , एकमेकांसाठी देवा कडे मागणं 
मागायचं 
कुठेही असलो तरी मैत्री साठी 
सर्वस्व पणाला लावायचं !!
--क्षमा 

दुनियादारी

Duniyadari
"दुनियादारी "-- सध्या प्रत्येक  मराठी माणसाच्या तोंडावर वारंवर येणारा शब्द !
आत्ताच प्रदर्शित झालेल्या या "महाविद्यालयीन काळातील दुनियादारी" दाखवलेल्या 
 चित्रपटा मुळे हा शब्द फारच प्रसिद्ध झाला . परंतु माझ्या मते या शब्दाचं मूळ हे 
प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. मग तो मराठी माणूस गिरगावातील 
चाळीत राहणारा किंवा डोंबिवली किंवा पुण्यात राहणारा असो / गणपतीत गणेशोत्सव साजरा 
करण्या करिता एकत्र येणारा असो/होळी साठी एक महिना आधी पासून साहित्य गोळा 
(चोरणारा ) असो.   शेजारच्या घरात आजारी पडणार्याची चौकशी  करण्या पासून 
शेजार्यांची काळजी घेणारा असो.  किंवा 
सोसायटीत कुणाच कनेक्शन कुणाशी यावर लक्ष ठेवणारा असो . आपल्या मुलां प्रमाणे 
शेजार्यांच्या मुलांवरही शिस्त लागावी म्हणून रागावणारा असो किंवा सणासुदीला एक 
मेकांना गोड धोड घरी नेवून देणारा असो .  शेजारी लग्न कार्य असेल तर आपल्या घरातच 
सण  समारंभ असावा त्याप्रमाणे शेजार्यांच्या पाहुण्यांची सरबराई करणारा असो .  
मराठी माणसाच्या रक्तातील हा गुण आहे असं म्हणायला हरकत नाही . या मुळेच 
एकेकाळी मराठी समाज एक आदर्श समाज म्हणून ओळखला जात होता आणि 
आपल्यातील ऐक्य टिकून आहे . आज अशी दुनियादरी टिकवणण्या साठी आपण आपल्या 
परीने काय प्रयत्न करत आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. अशी 
दुनियादारी टीकवण्याकरिता आणि आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना या साठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही काय कराल?

Wednesday, July 24, 2013

विरक्ती


"मी सगळ्यातून विरक्ती घेतली आहे" असं बर्याच माणसांकडून ऐकायला मिळतं . पण खरच 
असं म्हणणारी माणसं  विरक्त असतात का? आसक्ती चा नाश म्हणजे विरक्ती पण 
अशी विरक्ती जर सक्ती ने घेतलेली असेल तर त्याला खर्या अर्थाने विरक्ती म्हणता येणार नाही . 

  सक्तीची विरक्ती म्हणजे 
"ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होणार नाहीत किंवा 
 या पुढे आपण त्या साध्य करू शकणार नाही किंवा 
ज्या गोष्टींवरचा आपला ताबा नाहीसा होतो आहे आणि तो परत 
मिळणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या गोष्टी टाळणे पण 
मनातून असे झाल्याचे दुखः करत राहणे"

अशा सक्तीच्या विरक्तीने मनःशांती मिळणार तर नाहीच परंतु मनाची व्याकुळता जास्तच 
वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा सक्तीच्या विरक्ती पासून शक्यतो स्वतःला दूर ठेवण्याचा 
प्रयत्न करावा . त्या ऐवजी योग्य विचाराने आणि आचरणाने विरक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा . 
हे सहज शक्य नसले तरी सराव केल्याने सहज साध्य होण्या सारखे आहे.  
या साठी समाधानी वृत्ती ठेवणे जास्त महत्वाचे आहे .  खोटा अहंकार, स्पर्धा , तुलना या गोष्टी 
दूर ठेवणे गरजेचे आहे . आपण प्राप्त परिस्थितीत ज्या भूमिकेत आहोत ती योग्य तर्हेने पार 
पडण्यासाठी जो त्याग , कष्ट करावे लागतील ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि 
कर्तव्ये निष्ठेने आणि कसोशीने पार पाडावीत . असे केल्याने मनःशांती तर मिळेलच परंतु 
मन विरक्तीच्या दिशेनेहि सहजतेने वळवता येइल. 



Saturday, June 22, 2013

मीच माझा शत्रू !

Kedarnath

सध्या दूरदर्शन वर आपण केदारनाथ आणि आसपासच्या परिसरातील दुर्घटनेच्या बातम्या 
सतत पाहत आहोत. अनेक उध्वस्त झालेली कुटुंब आणि त्यांचे आक्रोश मन अस्वस्थ 
करत आहेत. काही क्षणात होत्याच नव्हत झालं आणि एकच क्रंदन सुरु झालं . हि भीषण 
अवस्था पाहिल्यावर एक गोष्ट पटली कि आपणच आपले शत्रू बनलो आहोत. आपला 
वाढता हव्यास, जीवनीतील भौतिक सुखांकडे आपला  वाढत असलेला अवास्तव 
कल , पुढच्या पिढ्यांचा विचार न करण्याची आपली  वाढती मानसिकता , वाढता चंगळवाद 
आणि त्यामुळे वाढणारी आपापसातील स्पर्धा !
प्रत्येक दिवसागणिक जितक जास्त भौतिक सुख मला मिळालं तितक खर्या अर्थाने मी 
जीवन जगलो अशी जर आपली मानसिकता असेल तर ती लवकरच आपल्याला आपल्या 
नाशाकडे घेऊन जाईल यात शंका नाही .  वेळ आली आहे ती योग्य विचार करण्याची … 
भविष्याचा विचार न करता  माणसाने निसर्गावर असेच अतिक्रमण चालू ठेवले तर 
 हा सहनशील निसर्गही असे रुद्र रूप वारंवार दाखवल्याशिवाय राहणार नाही . 
निसर्ग हि ईश्वरी देणगी आहे आणि तीच संगोपन आणि योग्य तर्हेने उपयोग करणे 
आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.  अधिकाराच्या , सत्तेच्या 
आणि श्रीमंती च्या मागे लागलेले आपण सर्वजण आज सोयीस्कर रित्या आपली 
कर्तव्य विसरत आहोत . आणि याचे परिणाम आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे 
लागतील यात शंका नाही . 

Friday, June 14, 2013

My corner: Ownership

My corner: Ownership: Ownership I am sure most of you think about an ownership flat, what with the skyrocketing prices of residential spaces today. But I am...

Thursday, June 6, 2013

भूतकाळातील नैराश्य


जे काही भूतकाळात  घडून गेल आहे, तसच आताही घडत राहील असं   नाहि. कारण या क्षणी
जे घडत आहे त्याची दिशा बदलण्याची संधी  तुम्हाला आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रद
प्रवास सुरु केला असेल आणि योग्य दिशेने पावले उचलली असतील तर तुम्ही प्रगतीचा वेग वाढवू शकाल .  तुम्ही भूतकाळात काही अडचणी किंवा नैराश्य अनुभवलं असेल तर नव्या दिशेनी जाण्याची हीच वेळ आहे.

जे काही घडून गेलं त्यावर विचार करत बसलात तर तुम्ही त्यातच गुंतून राहाल . त्यापेक्षा
योग्य दिशेने पावले उचला . "झटकून टाक जीवा  दुबळेपणा  मनाचा " हे वाक्य सार्थक करण्याचा
प्रयत्न करा .

आजचा  दिवस नवा आहे . तो नव्याने उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न करा . थोडक्यात
म्हणजे हा तुमचा दिवस आहे . जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्या  करता मदत करणार
आहे .

भूतकाळातील वाईट गोष्टींतून बाहेर पडण्याकरिता बरेच कष्ट आणि सातत्य लागेल परंतु
त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता .  भूतकाळातील दुक्खांच्या गर्तेत अडकण्या पेक्षा
भविष्य काळ उज्वल करण्या करिता पाऊले उचलणे केव्हाही श्रेयस्कर!
जस जसे तुमचे यश नजरेच्या टप्प्यात येऊ लागेल , भूतकाळातील दुख्खांचे चटके कमी
होऊ लगतिल. दूरदर्शी व्हा आणि  लक्षात ठेवा तुम्ही नक्कीच भविष्यातील प्रत्येक दिवस
एक नवा उत्तम दिवस म्हणून जगू शकता . 

Monday, June 3, 2013

स्वतः साठी पाच मिनिटे


केवळ पाच मिनिटात तुम्ही  शांत झोपेतून जागे होऊन  सकाळच्या गार हवेत 
फिरायला जाण्यासाठी तयार होऊ शकता .  
केवळ पाच मिनिटात टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद तुम्ही नीटनेटके 
करून काम करण्यासाठी टेबल स्वच्छ करू शकता  . 
केवळ पाच मिनिटात राग आणि नैराश्यातून बाहेर पडून तुम्ही नवा निर्धार करू शकता . 
नव्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता . 
केवळ पाच मिनिटात तुम्ही नकारात्मक विचार सकारात्मक करू शकता . 
पाच मिनिटं  हा जास्त कालावधी नाही .  ती पटकन निघून जातात .  
परंतु पाच मिनिटाच्या या काळात तुम्ही बरच काही पार करून जाता . 
नव्याने विचार करू लागता . विचारांची दिशा बदलायला कष्ट नक्कीच लागतात पण फार वेळ लागत नाही  . केवळ पाच मिनिटात तुम्ही निष्फळ विचारांतून बाहेर पडून ,  असा बदल घडवू शकता जो आयुष्यात पुढे जाऊन तुमचे हित करेल .  जे करणं गरजेच आहे अशा प्रत्येक गोष्टी करता पाच मिनिट द्या, योग्य विचार करा .  त्या पाच मिनिटात केलेला एक सकारत्मक विचार तुमच आयुष्य बदलू शकतो.  स्वतः साठी दिलेली अशी पाच मिनिटं आयुष्यात एक चिरकाल टिकणारा आनंद देऊ  कतात .  
बघा जमत का !




Tuesday, May 28, 2013

वास्तूशास्त्र

Vastu
नमस्कार मित्रांनो....

सगळ्यांनाच वास्तूशास्त्रा प्रमाणे घर घेता येणे अथवा बांधणे शक्य नाही. पण ते साधारणत: या चित्रात दिल्याप्रमाणे असावे....आणि असेही म्हंटले जाते की जगातील कोणतेही घर अगदी १००% वास्तुशास्त्राप्रमाणे असू शकत नाही. 

यातील ज्या उपदिशा आहेत त्या कमी महत्वाच्या नसून खूप खूप महत्वपूर्ण आहेत. आणि त्यांच्यावर पंचमहाभूतातील तत्वांचा प्रभाव असतो....आग्नेय या दिशेवर नावाप्रमाणेच अग्नी तत्व, ईशान्येवर जलतत्व, वायव्येवर वायू तत्व आणि नैऋत्य दिशेवर भूमी तत्वाचा प्रभाव असतो....तुलनेने नैऋत्य ही जास्त संहारक परिणाम देणारी दिशा आहे.....अर्थात तिथे खोदकाम केले, बोअर, विहीर मारली तर .....

स्वयंपाकाचा अग्नीशी संबंध असल्याने अर्थातच स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे उत्तमच, नसल्यास किमान किचन ओटा तरी आग्नेयेला असावा. Gas शेगडी आग्नेयेला तर सिंक इशान्य दिशेला हवे....घराचा मधला भाग शक्यतो मोकळा ठेवावा. देवघर ईशान्य किंवा आग्नेय दिशेला असावे.

देवघरात घरातील जिवंत किंवा मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत. त्या आपल्याला प्रिय असल्या तरी त्यांच्या फोटो मधून वाईट स्पंदने येत असू शकतात आणि ती प्रगतीला, उपासना स्थळाला नक्कीच मारक असतात. देवघरात स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, कलावती आई, सिद्धारूढ स्वामी या आणि अशाच इतर अनेक संत आणि सिद्धांचे मूळ, अस्सल फोटो अवश्य लावावेतच....त्यांच्या फोटोमधून येणारया लहरी अतिशय उपकारक असतात. घरात कोठेही काच, आरसे वापरात असाल तर जपून वापरा. कारण काच ही कोणतीही दिशा आणि वस्तू, वास्तू, चित्रे ....काचेत प्रतिबिंबित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गुणित करून दाखवते, वाढवून दाखवते आणि घर, वास्तू, दुकान मोठे असल्याचा भासही होतो....चुकीच्या ठिकाणी अयोग्य वापर झाल्यास वाईट गोष्टी, वस्तू प्रतीगुणीत होतील.

घरात सकाळ संध्याकाळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावणे खूप हितावह आहे. त्याचे अध्यात्मिक लाभ असतील ते असतील पण आपले मन मात्र प्रसन्न होते. आनंदाने भरून जाते. आणि देव नेहमीच प्रसन्न असतो. धूप, उदबत्ती लावून प्रसन्न करायचे असते ते आपल्या मनाला.....आपल्या घराला.... घरात मंगल ध्वनी, जपाची टेप असणे आनंददायी का होणार नाही? घरात, देवघरात, पायरीवर, उंबऱ्यावर आपल्याला जी येत असेल ती रांगोळी घालाच. ती घरामध्ये येणारया वाईट स्पन्दनांना अटकाव तर करेलच पण रांगोळी हे एक शुभ यंत्रच असल्याने रांगोळी घालणारा आणि ती पाहणारा या दोघांच्याही मेंदूत पर्यायाने मनात सकारात्मक बदल घडवून आणून भविष्य सुधारण्यास थोडी का होईना नक्की मदत करेल यात शंकाच नाही.

स्वयंपाक करत असताना किंवा जेवण्यापूर्वी अग्नीत, चुलीत, Gas शेगडीवर किंचित तूप लावलेला भात, पोळीचा, चपातीचा, भाकरीचा कशाचा तरी तुकडा असे काहीतरी थोडेसे समर्पित करा...अग्नी हा देवांचा दूत किंवा वाहक आहे. स्वयंपाक बनवीत असताना भगिनी मातांनी दुसऱ्याची उणी दुणी काढणे, संतापाने भांड्यांची आदळआपट करणे, नाराजीने स्वयंपाक बनवणे हे घरातील कोणालाही अजिबात हितकर नाही. आद्य शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत स्वयंपाक केला तर फारच उत्तम. येत नसल्यास देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा.




सौजन्य 

Dr. हेमंत उर्फ कलादास 



Tuesday, May 21, 2013

अमर्याद ~~


आयुष्यातल्या सर्वोत्तम गोष्टींच वर्णन तुम्ही कस कराल? आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी 
ह्या अमर्याद असतात .  उदाहरणच द्यायच झाल तर आपली कल्पनाशक्ती … ती कधीच संपत 
नाही उलट ती आपण जितकी जास्त वापरू तितकी तिची ताकद आणि व्याप्ती वाढतच जाते . 
तसच प्रेमाचही आहे , तुम्ही जितक जास्त निरपेक्ष प्रेम द्याल तितक जास्त ते तुमच्या आयुष्यातही 
वाढत जाईल . प्रामाणिक पणाने आयुष्य जगलात तर तुमची प्रामाणिक वृत्ती वाढतच रहिल. 
इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात आनंदाला पारावर उरणार नाही . 
या प्रमाणेच धैर्य , सभ्यता ,दया , शांती , विश्वास , मैत्री यांचाही विचार आपण करू शकतो. 
जितकी जास्त निष्ठा तुम्ही या सर्व गोष्टींवर ठेवाल तितकीच जास्त उत्तम उर्जा तुमचे जीवन 
व्यापून टाकेल . 
आयुष्यात आपण बरेच वेळा या सर्व गोष्टीन कडे सहज दुर्लक्ष करतो किंवा त्यांना मूर्ख पणाचे 
समजतो परंतु आयुष्यातल्या या उत्तम गोष्टी अमर्याद   आहेत .  त्या कधीही नष्ट होत नाहीत 
किंवा संपत नहित.  तुम्ही जितक्या उत्तम प्रकारे त्यांच्यासह  जीवन जगाल , तितक्याच 
त्या वाढत जाणार आहेत. 
खरतर  आयुष्यातल्या उत्तम गोष्टी ह्या महागड्या नसून सहज , सोप्या आणि  सुखद असतात 
हे नक्कि. 

व्हेज जयपुरी

व्हेज जयपुरी 

साहित्य:
१/४  वाटी गाजर 
१/४  वाटी फ्लॉवर 
१/४  वाटी मटार 
१/४  वाटी घेवडा (लांब चिरून घेणे)
२ चमचे कोबी 
१/४  वाटी तेल 
१/४  चमचा हळद 
१ चमचा तिखट 
१/४  चमचा कसुरी मेथी 
१ चमचा गरम मसाला 
१ चमचा साखर 
चवी नुसार मीठ 

कृती :
पाव वाटी तेल गरम करून त्यावर  हळद, तिखट ग्रेव्ही नंबर २ , भाज्या गरम मसाला , साखर, मीठ , कसुरी मेथी घाला व परता . १/२ ते १ वाटी पाणी घाला. भाजी शिजली कि पोळी किंवा पुरी बरोबर खा 

अधिक वाचा :  व्हेजिटेबल कुर्मा 

जरा विचार करा




नैराश्य हे दुसरे तिसरे काही नसून एक विचार आहे.  एक असा विचार ज्यावर तुम्ही ठाम 
राहिलात तर तुमच्या जीवनातील एका   सुंदर दिवसाच रुपांतर  एका वाईट अनुभवात होत. 
काळजी हाही एक विचारच आहे , असा विचार जो  तुम्हाला एका कैदया प्रमाणे जखडून ठेवतो. 
विश्वास आणि निर्धार हेही विचारच आहेत ज्यात तुम्ही स्वतः ला झोकून दिलत तर तुम्ही 
तुमच ध्येय साध्य करू शकता.   आनंद हा हि एक  विचार आहे आणि तो  जितका जास्त 
मनात राहील तितकच जीवन सुखमय आणि परिपूर्ण होइल.  आनंदी राहणं, अत्माविशास 
बाळगणं, निर्धाराने पुढे जात राहणं , मनः शांती ढळू न देणं ह्या सहज अंगीकारता येणाऱ्या 
गोष्टी आहेत . 
 जर तुमच्या मनाचा गोंधळ उडाला असेल, तर तुम्हाला कदाचित हे मुर्ख पणाच वाटेल , परंतु 
स्वतः ला विचारून पहा कि तुम्हाला या गोंधळातच अडकून राहायचा आहे कि यातून बाहेर 
पडून नवीन विश्वासाने आणि ताकदीने पुढे जायच आहे?
तुमचे विचारच , तुमची कृती ,तुम्हाला मिळणारी फळं (Results) आणि तुमचा जीवन प्रवाह 
ठरवत असतात . आणि तुम्हाला खरच काय व्ह्यायचं आहे त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात . 

जरा विचार करा तुम्हाला काय व्ह्यायचं आहे?

Sunday, May 19, 2013

व्हेजिटेबल कुर्मा


व्हेजिटेबल कुर्मा 

Vegetable Kurma 

     साहित्य:

     १/२  वाटी गाजर 
     १/२  वाटी घेवडा 
     १/२  वाटी मटार 
     १/२  वाटी फ्लॉवर 
     १/२  वाटी सायीचे दही 
     १/४ चमचा हळद 
     १ चमचा लाल तिखट 
     १ चमचा गरम मसाला 
     १ चमचा साखर 
     चवीनुसार मीठ 
     १ वाटी पाणी 
     १/४ वाटी रिफाईन्ड तेल किंवा डालडा 

      कृती : पाव वाटी रिफाईन्ड तेल गरम करून घ्यावे . त्यातच सायीचे दही, हळद ,लाल तिखट भाज्या , गरम मसाला ,  साखर , मीठ घालावे . १ वाटी पाणी घालावे . उकळी आली कि किसलेला पनीर, तृटीफ्रुटी , चेरी ने डेकोरेशन करावे . 

अधिक वाचा : व्हेज जयपुरी 
                                                                       

Friday, May 17, 2013

कठीण तरीही सुंदर

Rose
जीवन कठीण आहे तरीही सुंदर आहे.  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका 
सकारात्मक असावा कि जीवनातील अडचणी तुम्हाला निराश करू शकणार नाहीत . 
आयुष्यात संकटाना पाठ फिरवणे किंवा टाळणे हा उपाय नसून योग्य तर्हेने 
त्यांना समोर जाऊन त्यातून बाहेर पडणे यात खरे समाधान आहे. 
जीवनात प्रश्न ज्या सातत्याने निर्माण होतील त्याही पलीकडे जाऊन त्या प्रश्नांचा 
पाठपुरावा करून सोडवणे गरजेचे आहे. तुमचे कौशल्य, कष्ट , स्वभावातील  
लवचिकता  पणाला लावून मार्ग काढा . 
अतिशय नगण्य वाटणाऱ्या छोट्या गोष्टीतला आनंदही वाया जाऊ देऊ नका . 
आयुष्याच्या प्रत्येक धाग्यातील परिपूर्णता अनुभवायचा प्रयत्न करा . 
प्रत्येक क्षण आयुष्यात छोटे छोटे बदल करण्यासाठी संधी देत असतो. योग्य 
दिशेने उचलेलं एक पाऊलहि भविष्यातील मोठ्या बदलांना सहायक ठरते . 
एकाद्या टप्प्यात आयुष्य फारच कठीण होऊन बसत यात शंका नाही पण काय 
हरकत आहे?  सगळी दु:ख एकत्र केली तर जीवनातील उत्तम गोष्टी आणि त्यातून 
मिळणारा आनंद त्याही पेक्षा जास्त असतो , गरज असते ती जाणीव पूर्वक 
जीवन जगण्याची!

Wednesday, May 15, 2013

उंटाची दोरी...!

Camel



एकदा एक अरब व्यापारी शंभर उंटांचा तांडा घेऊन चालला होता. 
दिवस मावळताना तो एका गावात आला. गावातल्या मशिदीत एक 
फकीर राहत होता. व्यापारी त्याच्याकडे गेला. नमस्कार करून म्हणाला,
"मशिदीबाहेर मी माझे उंट बांधले आहेत.पण एका उंटाची दोरी व खुंटी 
वाटेत गहाळ झाली आहे.कृपया मला एक दोरी व खुंटी द्या !" त्यावर 
फकीर म्हणाला,"बांध रे तसाच बांध उंट!" व्यापारी पुन्हा म्हणाला ,
"अहो,दोरी आणि खुंटी नाही. मग कसा बांधू?" यावर फकिर म्हणाला, 
"चल मी बांधून दाखवतो उंट!" फकिर उंटाजवळ गेला. त्याच्याशेजारी 
खुंटी ठोकण्याचे नाटक केले.खुंतीला एक काल्पनिक दोरी बांधल्यासारखे 
केले आणी दोरीची गाठ उंटाच्या गळ्याला घट्ट बांधल्याचे नाटक केले. 
उंटावर एक थाप टाकली. आंइ आश्चर्य म्हणजे उंट खाली बसला. रात्रभर 
हलला नाही्. होता मोकळाच पण हलला नाही. सकाळी अरब जायला 
निघाला सगळे उंट उभे राहिले.पण हा उंट उठेचना. अरबाने फकिराला 
बोलावले.फकिर म्हणाला,"तसा कसा उठेल तो? त्याची दोरी सोडायला 
हवी!"असे म्हणून त्याने उंटाची दोरी सोडल्याचे,खूंटी उपटल्याचे नाटक 
केले. उंट लगेच उठला आणि अंग झटकून चालू लागला.


तात्पर्य : जे सवयीचे गुलाम असतात,ते स्वातंत्र्य गमावतात.... !

महागाई


Mehngai

पैसे मिळवण्याची सगळ्यांना लागली आहे घाई 
कारण त्याच एकच वाढती महागाई !!!!!
वाढत्या महागाईला तोंड देणार तरी कसं ?
घरातील वाढत्या जबाबदार्या आणि बदलती 
जीवनशैली हे सगळ पेलवेल का असं ?
जीवन का जगत आहोत?  जीवन कस जगत आहोत?
जीवन खर कसं जगायचं आहे ?  आता विचार करायला वेळ नाही 
कारण पाठीशी लागली आहे महागाईची कोल्हेकुई !
दिवस भर धावतो आहे, काबाड कष्ट करतो आहे 
तरीही दिवस अखेरीला मध्यमवर्गीय रडतो आहे. 
मध्यमवर्गीय असणं हा आता झाला आहे गुन्हा 
आणि उच्च वर्गात  झाला आहे लाजेचा भाग उणा 
लाज सोडून जगणं मध्यमवर्गीयाचा धर्म नाही 
भले दुःखाच जिण आल पदरी तरी त्याची फिकीर नाहि. 

वाईटातून चांगले  बदल कधीतरी नक्की होतील , 
प्रामाणिकपणाने जगणारे  विजयी ठरतील 
आता क्रांतीचे वारे वाहू लागतील आणि पुन्हा एकदा 
सगळे, सत्याचा असत्यावर विजय पाहतील !