Tuesday, May 28, 2013

वास्तूशास्त्र

Vastu
नमस्कार मित्रांनो....

सगळ्यांनाच वास्तूशास्त्रा प्रमाणे घर घेता येणे अथवा बांधणे शक्य नाही. पण ते साधारणत: या चित्रात दिल्याप्रमाणे असावे....आणि असेही म्हंटले जाते की जगातील कोणतेही घर अगदी १००% वास्तुशास्त्राप्रमाणे असू शकत नाही. 

यातील ज्या उपदिशा आहेत त्या कमी महत्वाच्या नसून खूप खूप महत्वपूर्ण आहेत. आणि त्यांच्यावर पंचमहाभूतातील तत्वांचा प्रभाव असतो....आग्नेय या दिशेवर नावाप्रमाणेच अग्नी तत्व, ईशान्येवर जलतत्व, वायव्येवर वायू तत्व आणि नैऋत्य दिशेवर भूमी तत्वाचा प्रभाव असतो....तुलनेने नैऋत्य ही जास्त संहारक परिणाम देणारी दिशा आहे.....अर्थात तिथे खोदकाम केले, बोअर, विहीर मारली तर .....

स्वयंपाकाचा अग्नीशी संबंध असल्याने अर्थातच स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे उत्तमच, नसल्यास किमान किचन ओटा तरी आग्नेयेला असावा. Gas शेगडी आग्नेयेला तर सिंक इशान्य दिशेला हवे....घराचा मधला भाग शक्यतो मोकळा ठेवावा. देवघर ईशान्य किंवा आग्नेय दिशेला असावे.

देवघरात घरातील जिवंत किंवा मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत. त्या आपल्याला प्रिय असल्या तरी त्यांच्या फोटो मधून वाईट स्पंदने येत असू शकतात आणि ती प्रगतीला, उपासना स्थळाला नक्कीच मारक असतात. देवघरात स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, कलावती आई, सिद्धारूढ स्वामी या आणि अशाच इतर अनेक संत आणि सिद्धांचे मूळ, अस्सल फोटो अवश्य लावावेतच....त्यांच्या फोटोमधून येणारया लहरी अतिशय उपकारक असतात. घरात कोठेही काच, आरसे वापरात असाल तर जपून वापरा. कारण काच ही कोणतीही दिशा आणि वस्तू, वास्तू, चित्रे ....काचेत प्रतिबिंबित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गुणित करून दाखवते, वाढवून दाखवते आणि घर, वास्तू, दुकान मोठे असल्याचा भासही होतो....चुकीच्या ठिकाणी अयोग्य वापर झाल्यास वाईट गोष्टी, वस्तू प्रतीगुणीत होतील.

घरात सकाळ संध्याकाळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावणे खूप हितावह आहे. त्याचे अध्यात्मिक लाभ असतील ते असतील पण आपले मन मात्र प्रसन्न होते. आनंदाने भरून जाते. आणि देव नेहमीच प्रसन्न असतो. धूप, उदबत्ती लावून प्रसन्न करायचे असते ते आपल्या मनाला.....आपल्या घराला.... घरात मंगल ध्वनी, जपाची टेप असणे आनंददायी का होणार नाही? घरात, देवघरात, पायरीवर, उंबऱ्यावर आपल्याला जी येत असेल ती रांगोळी घालाच. ती घरामध्ये येणारया वाईट स्पन्दनांना अटकाव तर करेलच पण रांगोळी हे एक शुभ यंत्रच असल्याने रांगोळी घालणारा आणि ती पाहणारा या दोघांच्याही मेंदूत पर्यायाने मनात सकारात्मक बदल घडवून आणून भविष्य सुधारण्यास थोडी का होईना नक्की मदत करेल यात शंकाच नाही.

स्वयंपाक करत असताना किंवा जेवण्यापूर्वी अग्नीत, चुलीत, Gas शेगडीवर किंचित तूप लावलेला भात, पोळीचा, चपातीचा, भाकरीचा कशाचा तरी तुकडा असे काहीतरी थोडेसे समर्पित करा...अग्नी हा देवांचा दूत किंवा वाहक आहे. स्वयंपाक बनवीत असताना भगिनी मातांनी दुसऱ्याची उणी दुणी काढणे, संतापाने भांड्यांची आदळआपट करणे, नाराजीने स्वयंपाक बनवणे हे घरातील कोणालाही अजिबात हितकर नाही. आद्य शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत स्वयंपाक केला तर फारच उत्तम. येत नसल्यास देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा.




सौजन्य 

Dr. हेमंत उर्फ कलादास 



Tuesday, May 21, 2013

अमर्याद ~~


आयुष्यातल्या सर्वोत्तम गोष्टींच वर्णन तुम्ही कस कराल? आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी 
ह्या अमर्याद असतात .  उदाहरणच द्यायच झाल तर आपली कल्पनाशक्ती … ती कधीच संपत 
नाही उलट ती आपण जितकी जास्त वापरू तितकी तिची ताकद आणि व्याप्ती वाढतच जाते . 
तसच प्रेमाचही आहे , तुम्ही जितक जास्त निरपेक्ष प्रेम द्याल तितक जास्त ते तुमच्या आयुष्यातही 
वाढत जाईल . प्रामाणिक पणाने आयुष्य जगलात तर तुमची प्रामाणिक वृत्ती वाढतच रहिल. 
इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात आनंदाला पारावर उरणार नाही . 
या प्रमाणेच धैर्य , सभ्यता ,दया , शांती , विश्वास , मैत्री यांचाही विचार आपण करू शकतो. 
जितकी जास्त निष्ठा तुम्ही या सर्व गोष्टींवर ठेवाल तितकीच जास्त उत्तम उर्जा तुमचे जीवन 
व्यापून टाकेल . 
आयुष्यात आपण बरेच वेळा या सर्व गोष्टीन कडे सहज दुर्लक्ष करतो किंवा त्यांना मूर्ख पणाचे 
समजतो परंतु आयुष्यातल्या या उत्तम गोष्टी अमर्याद   आहेत .  त्या कधीही नष्ट होत नाहीत 
किंवा संपत नहित.  तुम्ही जितक्या उत्तम प्रकारे त्यांच्यासह  जीवन जगाल , तितक्याच 
त्या वाढत जाणार आहेत. 
खरतर  आयुष्यातल्या उत्तम गोष्टी ह्या महागड्या नसून सहज , सोप्या आणि  सुखद असतात 
हे नक्कि. 

व्हेज जयपुरी

व्हेज जयपुरी 

साहित्य:
१/४  वाटी गाजर 
१/४  वाटी फ्लॉवर 
१/४  वाटी मटार 
१/४  वाटी घेवडा (लांब चिरून घेणे)
२ चमचे कोबी 
१/४  वाटी तेल 
१/४  चमचा हळद 
१ चमचा तिखट 
१/४  चमचा कसुरी मेथी 
१ चमचा गरम मसाला 
१ चमचा साखर 
चवी नुसार मीठ 

कृती :
पाव वाटी तेल गरम करून त्यावर  हळद, तिखट ग्रेव्ही नंबर २ , भाज्या गरम मसाला , साखर, मीठ , कसुरी मेथी घाला व परता . १/२ ते १ वाटी पाणी घाला. भाजी शिजली कि पोळी किंवा पुरी बरोबर खा 

अधिक वाचा :  व्हेजिटेबल कुर्मा 

जरा विचार करा




नैराश्य हे दुसरे तिसरे काही नसून एक विचार आहे.  एक असा विचार ज्यावर तुम्ही ठाम 
राहिलात तर तुमच्या जीवनातील एका   सुंदर दिवसाच रुपांतर  एका वाईट अनुभवात होत. 
काळजी हाही एक विचारच आहे , असा विचार जो  तुम्हाला एका कैदया प्रमाणे जखडून ठेवतो. 
विश्वास आणि निर्धार हेही विचारच आहेत ज्यात तुम्ही स्वतः ला झोकून दिलत तर तुम्ही 
तुमच ध्येय साध्य करू शकता.   आनंद हा हि एक  विचार आहे आणि तो  जितका जास्त 
मनात राहील तितकच जीवन सुखमय आणि परिपूर्ण होइल.  आनंदी राहणं, अत्माविशास 
बाळगणं, निर्धाराने पुढे जात राहणं , मनः शांती ढळू न देणं ह्या सहज अंगीकारता येणाऱ्या 
गोष्टी आहेत . 
 जर तुमच्या मनाचा गोंधळ उडाला असेल, तर तुम्हाला कदाचित हे मुर्ख पणाच वाटेल , परंतु 
स्वतः ला विचारून पहा कि तुम्हाला या गोंधळातच अडकून राहायचा आहे कि यातून बाहेर 
पडून नवीन विश्वासाने आणि ताकदीने पुढे जायच आहे?
तुमचे विचारच , तुमची कृती ,तुम्हाला मिळणारी फळं (Results) आणि तुमचा जीवन प्रवाह 
ठरवत असतात . आणि तुम्हाला खरच काय व्ह्यायचं आहे त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात . 

जरा विचार करा तुम्हाला काय व्ह्यायचं आहे?

Sunday, May 19, 2013

व्हेजिटेबल कुर्मा


व्हेजिटेबल कुर्मा 

Vegetable Kurma 

     साहित्य:

     १/२  वाटी गाजर 
     १/२  वाटी घेवडा 
     १/२  वाटी मटार 
     १/२  वाटी फ्लॉवर 
     १/२  वाटी सायीचे दही 
     १/४ चमचा हळद 
     १ चमचा लाल तिखट 
     १ चमचा गरम मसाला 
     १ चमचा साखर 
     चवीनुसार मीठ 
     १ वाटी पाणी 
     १/४ वाटी रिफाईन्ड तेल किंवा डालडा 

      कृती : पाव वाटी रिफाईन्ड तेल गरम करून घ्यावे . त्यातच सायीचे दही, हळद ,लाल तिखट भाज्या , गरम मसाला ,  साखर , मीठ घालावे . १ वाटी पाणी घालावे . उकळी आली कि किसलेला पनीर, तृटीफ्रुटी , चेरी ने डेकोरेशन करावे . 

अधिक वाचा : व्हेज जयपुरी 
                                                                       

Friday, May 17, 2013

कठीण तरीही सुंदर

Rose
जीवन कठीण आहे तरीही सुंदर आहे.  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका 
सकारात्मक असावा कि जीवनातील अडचणी तुम्हाला निराश करू शकणार नाहीत . 
आयुष्यात संकटाना पाठ फिरवणे किंवा टाळणे हा उपाय नसून योग्य तर्हेने 
त्यांना समोर जाऊन त्यातून बाहेर पडणे यात खरे समाधान आहे. 
जीवनात प्रश्न ज्या सातत्याने निर्माण होतील त्याही पलीकडे जाऊन त्या प्रश्नांचा 
पाठपुरावा करून सोडवणे गरजेचे आहे. तुमचे कौशल्य, कष्ट , स्वभावातील  
लवचिकता  पणाला लावून मार्ग काढा . 
अतिशय नगण्य वाटणाऱ्या छोट्या गोष्टीतला आनंदही वाया जाऊ देऊ नका . 
आयुष्याच्या प्रत्येक धाग्यातील परिपूर्णता अनुभवायचा प्रयत्न करा . 
प्रत्येक क्षण आयुष्यात छोटे छोटे बदल करण्यासाठी संधी देत असतो. योग्य 
दिशेने उचलेलं एक पाऊलहि भविष्यातील मोठ्या बदलांना सहायक ठरते . 
एकाद्या टप्प्यात आयुष्य फारच कठीण होऊन बसत यात शंका नाही पण काय 
हरकत आहे?  सगळी दु:ख एकत्र केली तर जीवनातील उत्तम गोष्टी आणि त्यातून 
मिळणारा आनंद त्याही पेक्षा जास्त असतो , गरज असते ती जाणीव पूर्वक 
जीवन जगण्याची!

Wednesday, May 15, 2013

उंटाची दोरी...!

Camel



एकदा एक अरब व्यापारी शंभर उंटांचा तांडा घेऊन चालला होता. 
दिवस मावळताना तो एका गावात आला. गावातल्या मशिदीत एक 
फकीर राहत होता. व्यापारी त्याच्याकडे गेला. नमस्कार करून म्हणाला,
"मशिदीबाहेर मी माझे उंट बांधले आहेत.पण एका उंटाची दोरी व खुंटी 
वाटेत गहाळ झाली आहे.कृपया मला एक दोरी व खुंटी द्या !" त्यावर 
फकीर म्हणाला,"बांध रे तसाच बांध उंट!" व्यापारी पुन्हा म्हणाला ,
"अहो,दोरी आणि खुंटी नाही. मग कसा बांधू?" यावर फकिर म्हणाला, 
"चल मी बांधून दाखवतो उंट!" फकिर उंटाजवळ गेला. त्याच्याशेजारी 
खुंटी ठोकण्याचे नाटक केले.खुंतीला एक काल्पनिक दोरी बांधल्यासारखे 
केले आणी दोरीची गाठ उंटाच्या गळ्याला घट्ट बांधल्याचे नाटक केले. 
उंटावर एक थाप टाकली. आंइ आश्चर्य म्हणजे उंट खाली बसला. रात्रभर 
हलला नाही्. होता मोकळाच पण हलला नाही. सकाळी अरब जायला 
निघाला सगळे उंट उभे राहिले.पण हा उंट उठेचना. अरबाने फकिराला 
बोलावले.फकिर म्हणाला,"तसा कसा उठेल तो? त्याची दोरी सोडायला 
हवी!"असे म्हणून त्याने उंटाची दोरी सोडल्याचे,खूंटी उपटल्याचे नाटक 
केले. उंट लगेच उठला आणि अंग झटकून चालू लागला.


तात्पर्य : जे सवयीचे गुलाम असतात,ते स्वातंत्र्य गमावतात.... !

महागाई


Mehngai

पैसे मिळवण्याची सगळ्यांना लागली आहे घाई 
कारण त्याच एकच वाढती महागाई !!!!!
वाढत्या महागाईला तोंड देणार तरी कसं ?
घरातील वाढत्या जबाबदार्या आणि बदलती 
जीवनशैली हे सगळ पेलवेल का असं ?
जीवन का जगत आहोत?  जीवन कस जगत आहोत?
जीवन खर कसं जगायचं आहे ?  आता विचार करायला वेळ नाही 
कारण पाठीशी लागली आहे महागाईची कोल्हेकुई !
दिवस भर धावतो आहे, काबाड कष्ट करतो आहे 
तरीही दिवस अखेरीला मध्यमवर्गीय रडतो आहे. 
मध्यमवर्गीय असणं हा आता झाला आहे गुन्हा 
आणि उच्च वर्गात  झाला आहे लाजेचा भाग उणा 
लाज सोडून जगणं मध्यमवर्गीयाचा धर्म नाही 
भले दुःखाच जिण आल पदरी तरी त्याची फिकीर नाहि. 

वाईटातून चांगले  बदल कधीतरी नक्की होतील , 
प्रामाणिकपणाने जगणारे  विजयी ठरतील 
आता क्रांतीचे वारे वाहू लागतील आणि पुन्हा एकदा 
सगळे, सत्याचा असत्यावर विजय पाहतील !


Tuesday, May 14, 2013

आज काय कराल?



*  बरेच दिवस रेंगाळलेल एखाद काम पूर्ण करा .  
*  कुणाची तरी एखादी गरज पूर्ण करून त्याला आश्चर्य चकित करा . 
*  काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा . 
*  ज्याला गरज असेल त्याला  तुमच्या साथीचा / सहवासाचा लाभ द्या . 
*  जे तुम्हाला येत असेल ते इतरांना शिकावा . 
*  विरोधकांची मते समजून घ्या 
*  कुणाचीतरी मनःपूर्वक प्रशंसा करा 
*  ताजेतवाने होण्या साठी थोडे चाला किंवा व्यायाम करा 
*  तुमच्या घराची स्वच्छता / आवरा आवर करा 
*  एखाद्या गोष्टी बद्दलची मनातील भीती बाजूला सारून धैर्याने तिला सामोरे जा 
*  कुणाचे तरी मनापासून आभार माना 
*  इतरांचे विचार ऐकून घेण्याचा मनापासून प्रयत्न करा 
*  मजे साठी एखादी गोष्ट करा 
*  स्वतः करिता व आपल्या आस पास असलेल्या माणसांकरिता सहनशील राहण्याचा प्रयत्न करा 

जीवनात अशा प्रकारे प्रत्येक दिवस नवीन कल्पना , आशा आकांक्षानि परिपूर्ण जगा . गेलेला 
क्षण परत येणार  नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचे मोल जाणा आणि आयुष्य सुंदर करा!

Monday, May 13, 2013

कडू कारले


Bitter Guard
कारलं किती "तुपात तळल आणि साखरेत घोळल तरी कडू ते कडूच "हे  जरी खर असलं 
तरी असं कडू कारलं बहुगुणी आणि बहुउपयोगी आहे यात शंका नाही . तुम्हाला आता 
प्रश्न पडला असेल कि सोबतचे चित्र कशाचे आहे? ते कारलेच आहे. परवा भाजी साठी 
कारली आणताना चुकून एक पिवळी छटा आलेलं कारलं भाजीतून आलं . ते न चिरता 
तसच ठेवलं आणि दोन दिवसात त्याने आपला रंग बदलला , तो असा! 
कारलं चवीला जरी कडू असलं तरी निरोगी जीवनासाठी हे एक उत्तम वरदान आहे 
असं म्हणायला काहीच हरकत नाही . हि माहिती मी खास अशांसाठी देते आहे ज्यांना 
कारलं अजिबात आवडत नाही  परंतु हे वाचल्यावर कदाचित ते खाण्याची इच्छा त्यांना 
होईल . 
साखरेचे रक्तातील प्रमाण कमी करण्या साठी कारल्याचा उपयोग होतो.  कारल कमी कॅलरी 
असणारी भाजी आहे.  म्हणजे फक्त १७ कॅलरी प्रती १०० ग्रॅम . परंतु यात फायबर, मिनरल्स 
आणि विटामिन यांचे प्रमाण चांगले असते. पचनशक्ती वाढवण्यास मदत करते आणि 
बद्धकोष्ठ दूर करते. 

कारल्याचा ज्यूस  योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहात फायदा होतो. 

कारल्याचा जूस कसा करावा : 
हिरवी कारली व्यवस्थित धुवून घ्यवित. त्याचे बारीक तुकडे करून , योग्य 
प्रमाणात पाणी मिसळून मिक्सर मधून वाटून घ्यवित. लिंबाचा रस व मीठ घालून रस ढवळून घ्यावा . 
सकाळी अंशपोटी (काहीही न खातापिता ) या रसाचे सेवन करावे . 

कारल्याचे अति सेवन करू नये . तसेच ज्यांना याची अलेर्जी असेल त्यांनी याचे सेवन करू नये. 

Sunday, May 12, 2013

जीवन आनंद !!!


नेहमी चांगल द्यायचा प्रयत्न करा! जेव्हा तुम्ही देऊ शकता त्या पलीकडे जाऊन 
देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळी तुमच्या श्रीमंतीला पारावर उरणार नहि. 
या साठी फार मोठे प्रयास किंवा  स्पर्धा या गोष्टींची गरज नसून केवळ मनाचा 
मोठेपणा  आणि कृतीची गरज आहे. तुम्ही जितके सचोटीने आणि प्रामाणिकपणे  
वागाल तितक्याच सहजतेने तुम्ही जे कर्म करत आहात त्याचे उत्तम फळ तुम्हाला 
मिळेल .  तुमच्या कडे जे काही आहे त्याबद्दल तुम्ही जितके कृतज्ञ असाल 
तितका अधिक आनंद त्यातून तुम्हाला मिळेल किंबहुना तुमच्या कडे जे काही आहे 
त्याची किंमत वाढेलजर तुम्ही सतत दुसर्याचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असाल 
तर तुम्हीच तुमची किंमत कमी करून घेत आहात असे समजा . 
असे न करता शक्य असेल तितकी सेवा देण्याचा प्रयास करा, ते तुम्ही जस जस करत 
जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी सहजतेने 
आणि अनाहूत पणे  पूर्ण होतिल. जीवनात सतत उत्तम गोष्टी देण्याचा आणि घडवण्याचा 
हेतू मनात ठेवून कार्य करत राहा तस केल्यास तुमच जीवनही तुमच्याशी तितकंच  
एकनिष्ट असेल यात शंका नहि. 

Saturday, May 11, 2013

बहावा

Bahawa

वीस दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध वृत्तपत्रात "बहावा फुलाला नाही , या वर्षी उशीरा  
फुलण्याचा योग आहे" असा तक्रारीचा सूर वाचायला मिळाला . परंतु आनंदाची 
गोष्ट अशी कि आज मी बहावा बहरलेला पाहिला . नेहमी प्रमाणे आक्सा बीच 
वरून परतण्याच्या वाटेवर त्याला पाहण्याचा योग आला .  बहाव्याच पिवळा रंग 
पाहून खरच मन प्रसन्न झालं  . गाडी रस्त्याच्या कडेला लावून माझ्या मोबाईल 
च्या कॅमेरात जमेल तसा त्याला टिपायचा प्रयत्न केला .  
बहावा पावसाची चाहूल घेऊन येतो असं म्हणतात . हवेत उष्मा बर्याच अंशी वाढला 
आहे आणि राज्यातील दुष्काळ ग्रस्त परिस्थिती दिवसेंदिवस भयावह रूप घेते आहे. 
बहरलेल्या  बहाव्याने मनात आशेची पालवी फुलली आहे. या वर्षी तरी पाऊस योग्य 
वेळेत सुरु होऊन , योग्य ठिकाणी , योग्य प्रमाणात पडेल अशी प्रार्थना आपण सर्वांनी 
करूया . हे सर्व जरी घडलं तरी पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्य वापर करण्याची 
जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक वर्षी मुबलक पाऊस पडेलच याची खात्री देता  येणार 
नाही परंतु योग्य नियोजन केल्यास पाण्याअभावी गाव ओस पडणार नाहीत 
आणि आयुष्य उध्वस्त होणार नाहीत हे नक्की .  


Friday, May 10, 2013

उत्तम मिसळ मिळणारी ठिकाणे

Misal


१)अण्णाबेडेकर, पुणे
२)मनशक्तीके॑द्र, लोणावळ
३)मामलेदार, ठाणे
४)मून मून मिसळ, डो॑बिवली
५)संजिवनी-माडिवाले कॉलनी, टिळकरोड
६)रामनाथ-साहित्यपरिषदेजवळ , टिळकरोड
७)श्री-शनिपाराजवळ पुणे
८)नेवाळे- चिंचवड
९)जयश्री-बजाजऑटोसमोर - अकुर्डी.
१०)दत्तस्नॅकस , पळस्पेफाटा.
११)कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२)जुन्नर बसस्थानक.
१३)फडतरे, कलानगरी.
१४)अनंताश्रम, जेलरोड, इंदौर
१५)गोखलेउपहारगृह, ठाणे
१६)भगवानदास, नाशिक
१७)फडतरे मिसळ कोल्हापुर
१८)गरवारे कॉलेजसमोर काटाकिर्र, पुणे
१९)प्रकाश, दादर
२०)दत्तात्रय, दादर
२१)वृंदावन, दादर
२२)आस्वाद, दादर
२३)आनंदाश्रम, दादर
२४)मामा काणे, दादर
२५)आदर्श, दादर
२६)समर्थ दादर(पूर्व)
२७)माधवराव, सातारा
२८)विनय (गिरगाव)
२९)बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०)शामसुंदर-सातपुरएमआयडीसी (अतिशयसुंदरमिसळ) नाशिक
३१)अंबिका -पंचवटीकारंजा (काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२)तुषार -कोलेजरोड (गोड ब्राह्मण मिसळ ) नाशिक
३३)कमलाविजय -दहिपुल (ब्राह्मण मिसळ) नाशिक
३४)गारवा - अंबड (लालमिसळ) नाशिक
३५)अलंकार -मेनरोड (मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त) नाशिक
३६)गुरुदत्त-शिंगाडातलाव (कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७)मिसळ पाव सेंटर - नेहरुउद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८)श्रीकृष्ण -तु ळशीबाग, पुणे
३९)वैद्यउपाहारगृह - फडकेहौद चौकाजवळ,बुधवार्/रविवारपेठ , पुणे
४०)खासबागची मिसळ कोल्हापुर
४१)चोरगे मिसळ कोल्हापुर
४२).बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३)मोहनचीमिसळकोल्हापुर
४४)टेंबेउपहारगृह-ठाकुरद्वार,
४५)छत्रेउपहारगृह-मुगभाटलेनच्यादारात.
४६)प्रकाश (जोगळेकर),सिक्कानगर -फडकेवाडीमंदिरासमोर
४७)सर्वोदय लंच होम ...करिरोड पुलाखाली (डिलाइलरोडचीबाजू)
४८)लोअरपरळस्टेशन (पश्चिम)च्याबाहेरपडल्यावरनेताजीलंचहोम
४९)बाजीराव रोडवर भिकारदासमारोती जवळ, Pune तापीक


सौजन्य: आदित्य मोडक 

तुम्हाला कस आयुष्य जगायचं आहे?

cake

तुम्ही खरच याचा विचार कधी केला आहे का? आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या 
गोष्टींतून तुम्हाला नक्की काय आणि कस हव आहे या बद्दल निर्णय घेतला आहे का?
प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला तुम्ही जे निर्णय घेत असता त्या वर तुमचे जीवन 
बर्याच अंशी अवलंबून असते. आयुष्यातील बर्याच गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्याही 
असू शकतात परंतु त्या चवकटीतही  आपल्याला शक्य असतील असे योग्य निर्णय आपण घेऊ शकतो . 
तुमचा जीवनाकडे अशाप्रकारे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच तुमच्या आयुष्यातच नव्हे तर या 
जगात एक वेगळे पण निर्माण करू शकतो. तुम्ही क्षणोक्षणी जे निर्णय घेत आहात त्यातून 
तुम्ही जीवनाच्या योग्य दिशेची वाटचाल करत आहात हे वेळोवेळी चाचपून पाहणे गरजेचे आहे. 
किंवा तुम्ही घेतलेल्या निर्णयांना तुम्ही योग्य तो न्याय देत आहात किंवा नाही हे जाणणे 
गरजेचे आहे.  निर्णय घेऊन शांत बसून कोणतेही कार्य साध्य होत नहि. कृती न करता आपल्या 
निर्णयाला नशिबाची साथ कधी मिळेल याची वाट पाहण्यात काही अर्थ नाहि . 
तुम्हाला हव तस तुमच आयुष्य घडू शकत. गरज आहे ती योग्य निर्णय घेण्याची 
आणि समर्थपणे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची!

Thursday, May 9, 2013

मराठमोळा आंबा आणि फणस !

Alphonso Mango
सध्या कोकणात कुणाकडेही गेल तरी स्वागत होत आंब्याच्या पन्ह्याने . थोडस काहीतरी तरी घ्या असं 
म्हणून पुन्हा आंब्याच्या फोडी नाहीतर ताजे गरे  समोर येतात . फारच झालं तर "आता जेवूनच जा असा आग्रह "झाला तर फणसाची भाजी , सांदण , पानात आंब्याचा रस, ताज्या आंब्याच लोणचं किंवा ताजा घातलेला मुरंबा , नाहीतर मग आंब्याच रायत किंवा कांदा आणि कैरी च लोणचं ,,,, यांनी ताट  सजत .  आमरस पुरीचा बेत म्हणजे कळसच ! बर निघताना मुलांसाठी आंबा पोळी, फणस पोळी , आंब्याच गोड लोणच असा खास खाऊ असतोच. असा हा खरा मराठमोळा आंबा आणि फणस  !
पण आता तो या पलिकडे ही जाऊन अनेक विविध रुपात शहरात सजत असतो. मिल्कशेक ,पुडिंग,आईस्क्रीम ,Mango विथ क्रीम , फ्रुटसलाड आणि बरच कहि.  विविध ठिकाणी "आंबा महोत्सव " साजरे होत असतात. विविध जातीच्या आंब्यांचा आस्वाद येथे घेता येतो.  एक गोष्ट मात्र नक्की कि ज्यावर्षी आंबा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्या वर्षी लोक फणसा बद्दल फारस बोलताना दिसत नहित.  "अहो आंब्याच्या धंद्यातूनच वेळ मिळत नाही , फणसा कडे कुठे पाहणार" अस बोलताना मी बर्याच व्यापाऱ्यांना ऐकल आहे.  परंतु आंब्या प्रमाणेच फणस महोत्सवही साजरा करण्यास काय हरकत आहे? 
कोकणातील या काळातील हे आंब्या फणसाचे ऐश्वर्य खर्या अर्थाने कोकणी कष्टकरी माणसाला भरभरून
आरोग्य आणि संपत्ती देऊन जाते आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाला एक आंतरिक समाधान मिळते .  
परंतु आता हे ऐश्वर्य किती काळ टिकेल याची चिंता वाटू लागली आहे. ज्या जमिनीवर एके काळी आमराई होती तिथे आता बंगले , इमारती उभ्या राहताना दिसत आहेत. कोकणातही सिमेंटच जंगल उभ राहात आहे. याच पद्धतीत कोकणाचा तथाकथित विकास झाला तर या पुढे काही वर्षांनी देवगड हापूस आंबा आणि फणसाची खोटी फळे केवळ संग्रहालयात पहावी लागतील .  खर्या अर्थाने या बाबत विचार करण्याची 
हीच वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं ?

Wednesday, May 8, 2013

विश्वासाने जगा !

Anand
जगातील खरा चांगुलपणा तुमच्यातच सामावलेला आहे. त्या चांगुलपणावर विश्वास ठेवा . 
जीवनाचा खरा आनंद तुमच्यातच सामावलेला आहे त्या आनंदावर विश्वास ठेवा. जीवन उत्तम जगण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. तुमचा चांगुलपणा , आनंदी स्वभाव आणि उत्तम हेतू यातून तुम्ही जीवनात नाविन्यपूर्ण  सकारात्मक बदल घडवू शकता हे जग स्वर्गाहून सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे.  तुमच्या कृतीतून /व्यवहारातून तुमच्यातील चांगुलपणा प्रतीत होणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःच एक आदर्श ठरण्याचा प्रयत्न करा तुमचे जीवनावरील प्रेम तुमच्या उत्तम हेतू मध्ये, कृतीमध्ये , नवनिर्मिती मध्ये , व्यवहारामध्ये जाणवेल असे जीवन जगा . जीवन सुंदर आहे आणि जीवनात असामान्य संधी  उपलब्ध आहेत. जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संधींच सोन करण्यासाठी व्यतीत करा  . तुम्हाला प्राप्त झालेल्या जीवनावर जीवापाड प्रेम करा आणि त्याला अधिक सुंदर करण्याचा आटोकाट प्रयत्न करा 

हे जीवन सुंदर आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Tuesday, May 7, 2013

आजचा दिवस वेगळा आहे !

जर जीवन चांगल आहे तर आजचा दिवसही चांगला  आहे. 
जर जीवनात अडचणी  असतील तर आजचा दिवस अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन कृती करण्याचा व त्यातून अनुभव संपन्न होण्याचा आहे. 
तुमच्या समोर काहीही असले तरी आजचा दिवस वेगळा आहे.  आणि तुम्ही तो तुमच्या कृतीने आगळा वेगळा घालवण्याचा प्रयत्न करू शकता . 
तुमच भविष्य तुमच्या भूतकाळावर ठरत नसून ते तुमच्या भविष्यातील अपेक्षांवर ठरत असते. आज तुम्ही  एका उच्च पातळी  पर्यंत  त्या अपेक्षांची कल्पना मनात द्रुढ केली पहिजे. आजचा  दिवस हा अनेक आव्हानांनी आणि सचोटीने परिपूर्ण आहे.  अशा आव्हानांचा सामना करण्याचा संकल्प करा आणि त्यातून मार्ग काढा . 
आजचा  दिवस वेगळा आहे !त्याला  एका योग्य  विचाराने, औत्सुक्याने , शिस्तबद्ध रीतीने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार तुमचा आहे.  
आजचा दिवस वेगळा आहे ! त्याला आपल्या कर्तुत्वाने अविस्मरणीय बनवूया! 

शुभ दिवस!

Monday, May 6, 2013

परिस्थिती


तुमची परिस्थिती हा तुमचा परिचय नाही किंवा तुमची परिस्थिती कोणत्याही कारणांनी तुम्हाला अडवत नाही     परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आणि निष्ठेने तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता . जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी 
तुम्ही बदल घडवू शकता, नवीन गोष्टी निर्माण करू शकता, प्रगती साधू शकता . 
केवळ , हे सोपं कि हे अवघड , योग्य कि अयोग्य, शक्य कि अश्यक्य  याचा तर्क करून परिस्थिती बदलणार नाही . त्यापुढे जाऊन पाऊल टाका . तुमच्या जीवनासाठी जे काही योग्य आहे  ते करा !तुम्ही एका मोठ्या लवचिक उर्जेच्या जगात जगत  आहात . ती अशी उर्जा आहे जी तुम्ही तुमच्या हिताकरिता योग्य रीतीने वापरून प्रगती साधू शकता .  तुमची परिस्थिती तुमचा ताबा घेण्याआधी तुम्ही परिस्थितीचा ताबा घ्या . सतत नवीन संधींचा उपयोग करून घ्या , नवीन गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास घ्या . तुमच्या परिस्थितीला कारण न ठरवता तिला प्रगतीची सुरवात समजा . तुमच्यातील "स्व" ला जागृत करून परिस्थितीवर मात करण्याची जिद्द बाळगा !

Sunday, May 5, 2013

आनंदी राहा!

आनंदी राहा!  जिथे असाल जसे असाल तसे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा . किंबहुना आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करा . कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज आनंद देणार 
नाही पण आनंद मिळवण्याची संधी मात्र नक्कीच देईल . 
जर आनंदाचे काही कारणच  नसेल तर आनंदी कसे राहणार? त्यासाठी आनंदालाच तुमचे कारण बनवा आणि त्याचा अनुभव घ्या !सकारात्मक विचार आणि खरा आनंद हेच मनाला बळकटी देतात . आनंदासाठी लाचार होऊन कारण शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक क्षण हीच आनंदी जीवनाची संधी आहे हे जाणणे , आवश्यक आहे. आनंद हि तुमची प्रतिक्रिया नसून तिला तुमची वृत्ती बनवा . प्रत्येक कृती मागे आनंद घेण्याचा हेतू ठेवा तरच ते तुमच्या जीवनातील एक सत्य असेल. हि गोष्ट खरच साधी, सोपी आणि कुणालाही जमण्या सारखी आहे. असं झाल्यास खरा  आणि निखळ आनंद दूर नहि. अनुभवून पहा!

चितळे बंधू

'चितळे बंधू' यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य 


दिवसाला तीन टन बाकरवडी आणि विविध उत्पादनांसाठी रोज चार लाख लिटर्स दूध संकलन, म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा जगातला पहिला सुसज्ज गोठा, भिलवडीतलं म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र, ऑनलाइन ऑर्डर दिल्यास जगाच्या कोनाकोपऱ्यात खाद्यपदार्थ पोहोचवणारं व्यवस्थापन, असा अवाढव्य उद्योग पसरवलेल्या 'चितळे बंधू' यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य दडलंय ते त्यांच्या गेली चार पिढय़ा एकत्रित असलेल्या कुटुंबामध्ये. कै.भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी लावलेल्या या रोपटय़ाचा वटवृक्ष करणाऱ्या, या उद्योगात रमलेल्या चितळे कुटुंबीयांविषयी..
आमचे चितळे' यातलं कौतुक प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वसलेलंच आहे आणि ते खरंखरं 'पोटातून' आलेलं आहे. १९३६ च्या सुमारास कृष्णेकाठी भिलवडी गावात सुरू केलेल्या दुधाच्या धंद्याचं रूपांतर आता उद्योगसमूहात झालं आहे. १५० लिटर्स दुधाचा धंदा रोज ४ लाख लिटर्स दूध संकलनावर पोहचला आहे. भिलवडी परिसराचा कायापालटच केला आहे 'चितळ्यांनी.'
कै. भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी प्रारंभीच्या दिवसात अपार कष्ट उपसले. रात्र रात्र जागून बासुंदी आटवली आहे. मुंबई-पुण्यात गुजराथी व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून उत्तम चक्का तयार केला आणि 'व्यवसायात यशस्वी व्हायचं तर विपणन व्यवस्थाही आपलीच हवी' हा आग्रहही त्या काळात धरला आहे, तेव्हा आजचं यश लाभलं आहे.
काय असेल याचं रहस्य? कै.भास्कर गणेश ऊर्फ बी.जी.चितळे यांचे थोरले सुपुत्र रघुनाथराव आज ९४ वर्षांचे आहेत. त्यांनी तीन शब्दात उत्तर दिलं. 'कष्ट, सातत्य आणि सचोटी'. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, ''ज्या दिवशी दुधात पाणी घालायची इच्छा होईल त्या दिवशी धंदा बंद करून नोकरी करा.'' पण तसं व्हायचं नव्हतं. 'चितळे डेअरी', मग 'शिवसंतोष दुग्धालय' नंतर १९५०मध्ये डेक्कन जिमखान्यावर मिठाईचं दुकान आणि नंतर बाजीराव रोडवर दुकान, विस्तार वाढतच होता. पुण्यात रघुनाथराव आणि राजाभाऊ तर भिलवडीला दत्तात्रेय आणि परशुरामभाऊ जोमानं काम करत होते. भास्कररावांच्या दूरदृष्टीने एका मुलाने म्हणजे मुकुंदभाऊंनी पूर्ण ट्रान्सपोर्ट विभाग सांभाळला होता. शिवाय मुकुंद चितळ्यांनी भिलवडीतील 'चितळे डेअरी'च्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम केले. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ, सिंहगड शिक्षण संकुल उभारून बांधकाम व्यवसायातही चितळ्यांच्या नावांची पताका रोवली.
कोणत्याही उद्योगात तांत्रिक प्रगती अपरिहार्यच असते आणि तशी ती केली तरच मोठी झेप घेता येते. 'दूध संकलन आणि वितरणाची जबाबदारी म्हणजे एखाद्या अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरइतकी कौशल्याची आणि नाजूक आहे. सुरुवातीला दर्जा नियंत्रणासाठी आम्ही खास माणसं नेमायचो. लोकांच्या बरण्यांमधलं दूध तपासून पाहायचो. पुढे पिशव्या आल्या आणि पुष्कळ गोष्टी सोप्या झाल्या.' रघुनाथराव जुने दिवस आठवत सांगतात. पुढे पुढे मुलांनी खूप आधुनिक तंत्रज्ञान आणलं.
चितळे कुटुंबात तिसरी आणि चौथी पिढीसुद्धा व्यवसायातच उतरली आहे. अगदी अपवाद म्हणूनही कुणी बाहेर नोकरी करत नाही. ''यात आश्चर्य काही नाही''. बाजीराव रोडचं दुकान सांभाळणारे श्रीकृष्ण चितळे सांगतात, ''लहानपणापासून वडिलांनी त्यांच्यापाठोपाठ दुकानात जायची गोडी लावली. सक्ती केली नाही. पण वेळ वायाही घालवू दिला नाही. निरीक्षण करून करून अनेक गोष्टी शिकता येतात. आमची मुलंही तशीच ओढीनं दुकानात आली.''
भिलवडीला तिसरी पिढी म्हणजे विश्वास परशुराम चितळे इंजिनीयर झाले तेव्हा मित्रमंडळी अमेरिकेत येण्याचा आग्रह करत होती. तेव्हा वडिलांनी गोडीनं सांगितलं, ''मी तुला डॉलर्समध्ये तेवढाच पगार देतो. वर्षभर काम कर, नाहीतर खुशाल जा.'' विश्वासनं ते मानलं आणि भिलवडीतच संशोधन विकासात इतके रमले की आज ते उद्योगक्षेत्रातल्या 'डेल पुरस्काराचे मानकरी' आहेत.
''आपले शरुकाका.. त्यांनी इंजिनीयिरगची गोडी लावली आणि वडिलांनी डेअरी टेक्नॉलॉजी केलेलं शिवाय त्यांचा अनुभव समृद्ध .. त्यामुळे या सर्वानी भिलवडीला खूप तांत्रिक प्रगती केली'' विश्वासराव सांगतात. चितळे डेअरीचा व्याप अनंत, विश्वास, श्रीपाद, गिरीश आणि मकरंद यांनी एकदिलाने पाच पांडवांप्रमाणे वाढविला आणि सांभाळला आहे.
कोणत्याही व्यवसायात किंवा कुटुंबातही दोन पिढय़ांमध्ये संघर्ष कधी होतो. एक म्हणजे नवीन तंत्राची ओढ आणि दुसरं पसा. चितळ्यांकडे संस्थापक भास्कर गणेश यांनीच नेहमी काळाच्या पुढे पाऊल टाकलं. त्या काळात सुसज्ज पाश्चरायझेशनची सुरुवात त्यांनी केली. वैयक्तिक पातळीवर पिशव्यांतून दूध देण्याचा प्रारंभ केला. चक्का-खवा यासाठी मशिनरी आली.
भारतात पहिल्यांदा १९८८-८९ मध्ये चितळ्यांच्या दुकानात आरएफआय बििलग सिस्टीम आली. म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा सुसज्ज गोठा जगात पहिल्यांदा चितळ्यांनी भिलवडीत उभारला.
आणि आता म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र भिलवडीतच आहे, ज्याचा फायदा परिसरातले शेतकरी घेतच आहेत. पण कोणताही शेतकरी त्यांच्याकडून अशा तऱ्हेचं मार्गदर्शन घेऊ शकेल.
इकडे पुण्यात ७०-७१च्या सुमाराला राजाभाऊ चितळयांनी नागपूरची पुडाची वडी आणली. गुजराती बाकरवडीला मागे सारत खास मराठी चवीची बाकरवडी आणली आणि या बाकरवडीनं चितळ्यांना जगभर पोचवलं. दुकानासमोर रांगा लागायच्या. ५० माणसं ठेवली कामाला तरी दिवसाला ५०० किलोपेक्षा जास्त बाकरवडी बनत नव्हती. राजाभाऊ, श्रीभाऊ आणि माधव चितळे यांनी परदेशात जाऊन सतत प्रयोग करून आपल्याला हवं तसं बाकरवडीचं मशीन बनवून घेतलं. आता दिवसाला ३ टन बाकरवडी बनवता येते आणि कंटेनर्स भरभरून परदेशातही जाते.
चितळेंनी कधी पासष्टाव्या कलेला म्हणजे जाहिरातीला आपलं मानलं नाही. डेक्कन जिमखान्यावरचे संजय म्हणतात, ''कशाला हवी जाहिरात? दर्जा आणि चव या दोन्ही गोष्टी करतातच की जाहिरात.'' एकदा सह्य़ाद्री वाहिनीनं चितळ्यांवर एक लघुपट केला. तो प्रसारित झाल्यावर प्रतिक्रिया आल्या ''हं, हल्ली मशीनवर बनवतात बाकरवडी, तरीच पूर्वीची मजा नाही राहिली.'' गंमत म्हणजे तोवर बाकरवडीचं मशीन येऊन १० वर्षे झाली होती. बाकरवडीचं उत्पादन आणि खप कित्येक पटीनं वाढला होता.
''एकाच व्यवसायात कायम टिकायचं असेल तर घरं वेगवेगळी ठेवा'' हाही मूलमंत्र बी.जी.चितळे यांचाच. त्यामुळे सुरुवातीपासूनच ज्याला हवा त्याला स्वतंत्र संसार मिळाला. आता तर डेअरी, मिठाई, अ‍ॅग्रो, फूडस् आणि चितळे डिजिटल्स.. सारे स्वतंत्र उद्योग आहेत. मिठाईवाले जसे इतरांकडून कच्चा माल घेतात तसाच भिलवडीहून खवा घेतात. पशाचा हिशेब चोख. सर्व घरांना ठरलेली रक्कम मिळाली की नफा पुन्हा व्यवसायवृद्धीसाठी वापरतात. बाहेरच्या माणसांना तर नाहीच, पण बाहेरच्या पशांनांही चितळ्यांकडे प्रवेश नाही.
व्यावसायिक आघाडीवर चितळ्यांच्या घरातील स्त्रिया कधी फारशा दिसल्या नाहीत. पण प्रारंभी जानकीबाईंनी दूध मोजून घेण्यापासून चक्का बांधायची कापडं साफ करण्यापर्यंत कित्येक कामं सांभाळली. भिलवडीत पद्मजा परशुराम यांनी दुधाचे हिशेब, दर तासानं निघणारे टेंपो, चक्का, खवा यांवर तर नजर ठेवलीच, पण आज त्या चितळे अ‍ॅग्रोच्या फळबागेत सकाळ-संध्याकाळ एक फेरी मारतात. अन् कसलंही उणं त्यांच्या नजरेतून सुटत नाही असं म्हणतात. पुण्याला मंगलाताई, विजयाताई आणि सुनीताताई यांनी पूर्ण दर्जा नियंत्रण कित्येक वर्षे सांभाळलं. सकाळ-संध्याकाळ कारखान्यात फेरी, तळणावर लक्ष, वडय़ांमधली साखर, श्रीखंडातलं केशराचं प्रमाण यावर रोजच लक्ष ठेवावं लागलं.
आज तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतल्या सुना उच्चश्ििाक्षत आहेत. गरजेप्रमाणे लक्ष देतात. पण रोजची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. विश्वास चितळेंचं उत्तर असं की, ''त्यांनी घर आणि माणसं सांभाळली म्हणून आम्ही सर्व भाऊ-काका एकत्र टिकून राहिलो. आमच्या आजी-आई-काकूमुळे चितळ्यांच्या पदार्थाच्या चवीचं स्टँडर्डायझेशन झालं हे मोठं योगदान आहे.''
व्यवसाय करता करता संस्कृती निर्माण करणं, टिकवणं आणि वाढवणं हे उत्तम उद्योगाचं लक्षण आहे. भिलवडी परिसरातल्या शेतकऱ्यांना हजारो म्हशी देऊन, देखभाल करून, दूध विकत घेणारे चितळे तेथील शेतकरी स्त्रियांसाठी अनेक आरोग्य प्रकल्प राबवतात. त्यांना आधुनिक माहिती पुरवतात. एक हजार जोडप्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी विविध कामांमध्ये गुंतवलं आहे. शास्त्रीय पद्धतीनं जेनेटिक्सद्वारा गुणवृद्धी करून येत्या काही वर्षांत दहा लाख उत्तम वासरं जन्माला घालण्याचे प्रयोग चालू आहेत. त्यातून दुधाचं उत्पादन प्रचंड वाढेल. शेतीतही नवनवे प्रयोग चालू आहेत. रेडीमिक्सची सकस पाकिटं ते बनवताहेत. दुधापासून दुधाच्या महापुरापर्यंत आणि सकस शुद्ध चवीपासून गृहलक्ष्मीच्या आरोग्यापर्यंत चितळे कुटुंबीयांचं काम पोहचत आहे.

सौजन्य - मुरारी लिमये